September 2019

बेलापूर  ( प्रतिनिधी )- बेलापूर पोलीसांनी बिड येथे चाललेला गव्हाचा भरलेला ट्रक पकडला असुन या बाबत चौकशी चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले     श्रीरामपूर तालुक्यातुन या ट्रकमध्ये गहु भरलेला होता तो ट्रक बेलापूर येथे वजन करण्यासाठी जात असताना पोलीसांना संशय आला या बाबत चालकाकडे विचारणा केली असता त्यास व्यवस्थित माहीती देता आली नाही त्यामुळे पोलीसांनी चौकशी करीता तो ट्रक पोलीस स्टेशनला आणला या बाबत पोलीसांनी चौकशी केली असता हा गहु बि बियाणे महामंडळाकडून उचलला असल्याचे सांगण्यात आले असुन कमी प्रतिचा हा गहु असल्याचे ट्रक चालकाचे म्हणणे आहे हा गहु बिड येथे चालला होता या बाबत बेलापूर पोलीसाकडून चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील हॉटेल अजिंक्यतारा येथे हॉटेलच्या कूकचा खून करण्यात आल्याची घटना भेर्डापूर परिसरात रविवारी दुपारी घडली. तालुक्यातील भेर्डापूर-पाथरे रस्त्यावर हॉटेल अजिंक्यतारा आहे. त्याठिकाणी काल दुपारी हॉटेलचा कूक मोहम्मद शेख (वय 71) यांना डोक्यामध्ये जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे ते जागीच ठार झाले.सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान हे पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे, रवींद्र पवार, सतीश गोरे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. वायकर, काका मोरे, संदीप पवार, रवींद्र शेळके यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जागेची पाहणी करून पंचनामा केला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही हॉटेलचे वेटर व कुक यांच्यात झालेल्या अंतर्गत वादातून घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

औरंगाबाद: कुळाची जमीन परत मिळावी,याकरीता तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रुपये लाचेची मागणी करून वकिल आणि मदतनिसामार्फत १ लाख रुपये लाच घेताना पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे आदर्श तहसीलदार म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सावंत यांचा गौरव झाला होता.अ‍ॅड. कैलास सोपान लिपने पाटील (३८,रा. मित्रनगर) आणि मदतनिस बद्रीनाथ कडुबा भवर (३५, रा.भानुदासनगर)अशी अन्य आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार  तक्रारदार  यांनी पैठण तालुक्यातील पांगरा येथील १२ एकर १४ आर कुळाची जमीन खरेदी केली आहे. कुळाची ही जमीन परत मिळावी, म्हणून मूळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठण तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे दावा दाखल केला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी होते. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदार सावंत यांनी अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि  बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत ३० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.  या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अ‍ॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली. यानंतर आज २९ सप्टेंबर रोजी पैठण तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचला.  यावेळी तहसीलदार सावंत यांनी त्यांच्या कार्यालयातच अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्री यांच्या उपस्थितीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून  एक लाख रुपये घेतले. लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केली. पोलीस नाईक बाळासाहेब राठोड, गोपाल बरंडवाल, रविंद्र अंबेकर आणि संदीप आव्हाळे यांनी त्यांना मदत केली.

बुलढाणा - 29 सितंबर
महाराष्ट्र में होने जा रहे विधानसभा चुनाव की हलचल तेज़ हो गई है.आज काँग्रेस के महासचिव मुकुल वासनिक के हस्ताक्षर से राज्य के 51 विधानसभा निर्वाचन क्षेत्र के लिए 51 उम्मीदवारों के नाम का अधिकृत रूप से एलान किया गया है.हालांकि काँग्रेस छोड़ कर अब तक अन्य किसी भी दल ने अपने प्रत्याशियों के नाम की घोषणा नही की है.घोषित 51 नामो में बुलढाणा जिले के 2 ही निर्वाचन क्षेत्रों की घोषणा की गई है जिसमें बुलढाणा के विद्यमान विधायक हर्षवर्धन सपकाल तथा मेहकर से एड.अनंत वानखेडे का समावेश है.चिखली के विद्यमान विधायक व काँग्रेस के जिलाध्यक्ष राहुल बोन्द्रे का नाम इस पहेली सूची में नही आने के कारण कई प्रकार की चर्चाएं जिले में हो रही है.

राहुरी (तालुका प्रतिनिधी)-राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या कोम्बीग ऑपरेशन मोहिमेत भरत अशोक चितळकर हा अट्टल गुन्हेगार जेरबंद केला. त्याचे दोन साथीदार पोलिसांना पाहताच पसार झाले. चितळकरवर राहुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.राहुरी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल, पोउपनि. गणेश शेळके तसेच दहा पोलीस कर्मचारी व दोन महिला कर्मचारी यांनी ही मोहीम राबविली. राहुरी पोलिसांच्या धडक कारवाईमुळे बारागाव नांदूर परिसरातील पसार गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भरत चितळकर यास पाठलाग करून पकडण्यात आले. चितळकर याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 237/19 नुसार भादंवि. कलम 399, 402 अन्वये, तसेच राहुरी पोलीस गुन्हा रजिस्टर क्रमांक 621/19 नुसार भादंवि. 399, 402 अन्वये व सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/19 नुसार भादंवि 395 (नुकताच पेट्रोल पंपा नजिक घडलेला दरोडा ) असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, चितळकरला बेड्या ठोकल्याने आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

बुलडाणा - 29 सप्टेंबर
एकीकडे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत असतानाच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांची ऑनलाइन चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. खातेधारकांना खात्याचे तपशील न विचारता किंवा ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारा ओटीपीही न विचारता थेट ग्राहकांच्या खात्यातून रक्कम गहाळ होत असल्याच्या अनेक घटना मागील काही आठवड्यांत घडल्या आहेत. यामध्ये बुलढाण्यात ही असाच प्रकार घडला असून या प्रकरणात ग्राहकाने बैंके विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
        बुलडाणा येथील तक्रारकर्ते वसीम शेख यांचे अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत खाता आहे.त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला असून मोबाईल मध्ये गुगल पे या एप्सच्या माध्यमातून ते इतरांना पैशे ट्रांसफर करतात. दरम्यान 13 सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्रांच्या म्हणण्यावरून त्याच्या औरंगाबाद येथील कोटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरिता 7 हजार रुपये पाठविले असता हे 7 हजार त्याच्या मित्राच्या अकाउंट मध्ये न जाता इतरत कुठे गेले व यांच्या अकाउंड मधून 7 हजारची कण्यात झाली. तक्रारकर्ते शेख हे  याची माहिती विचारायला अक्सिस बँकेत गेल्यानंतर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांच्याशी संपर्क करा असे सांगण्यात आले. जेव्हा दोन ते तीन वेळा गुगल पे यांच्या कस्टमर केअरला सांगितल्या नंतर अकाउंड मध्ये कपात झालेले 7 हजारा ची रक्कम 21 सप्टेंबर रोजी परत आली. मात्र 22 सप्टेंबर ला रात्रि 1 वाजून 13 मिनिटाला गुगल एग्रोमार्ट नावाने कोणतेही बँकेचा ओटीपी नंबर न येता परस्पर 3 हजार 250 रुपये अकाउंड मधून कापल्या गेले.याची माहिती एसएमएस च्या माध्यमातून कळल्यानंतर यासंदर्भात वसीम शेख यांनी 25 सप्टेंबर रोजी अक्सिस बँकेत जाऊन याबाबत शाखेतील ऑपरेशन हेड किशोर धुर्वे यांना विचारपूस केली असता त्यांना तुमचा अकाउंड हैक झाल्याची माहिती देत ऑनलाइन पद्धतीने पैसे कापल्या गेले असून एटीएमचा पिन नंबर बदलण्याचा सल्ला देत उडवा-उडवी ची उत्तरे दिली.यामुळे वसीम शेख यांनी बुलडाणा शहर पोलिसात अक्सिस बँकेने अकाउंट मधून विना परवानगी परस्पर पैसे कापून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली यावरून पोलिसात 27 सप्टेंबर ला बुलडाणा येथील अक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एव्हढेच नव्हे तर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला पुन्हा मध्यरात्री गुगल एग्रोमार्ट नावाने कोणतेही बँकेचा ओटीपी नंबर न येता पुन्हा परस्पर 3 हजार 250 रुपये अकाउंट मधून कापल्या गेले.यासंदर्भात अक्सिस बँकेने ऑनलाइन पद्धतीने ओटीपी नंबर न देता अकाउंड मधून परस्पर कसे पैसे ट्रान्सफर केले याचा तपास पोलीस करीत आहे.

गंगापूर औरंगाबाद महामार्गावरील
अरबी मदरसा जवळ डिझेल - पेट्रोलची वाहतुक करणारा टँकर पलटी झाला. अपघातात टँकरने रस्त्यालगत एक पलटी घेतल्याने टँकरच्या झाकणांमधून इंधनाची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कायगाव येथे गांधी पेट्रोल पंप येथे जात होता. सुदैवाने इंधनाची गळती होऊनही अन्य घटना घडली नाही.
रस्त्याचे काम चालू होता परंतु काय दिवसापासून हे रस्त्याचा काम बंद पडला आहे त्यामुळे ही घटना घडली आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी वाचनात आला आहे.  पेट्रोल  3 हजार व 9 हजार लिटर डिझेलची घेऊन जात होता . घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. इंधन वाहतूक करणारा टँकर एम एच 18 जी 2465   मनमाड मार्ग गंगापूर कायगावकडे
जात होता. येणारे जाणारे दोन्ही बाजूचे मोहन तीन तास थांबवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस निरीक्षक अर्जुन चव्हाण यांच्यासह त्या परिसरामध्ये राहणारे शमशेर शेख,   बाबा शेख, नीलेश गांधी, यांच्यासह पोलिस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने मदत केली.

शिर्डी प्रतिनिधी:- शिर्डी येथिल सुपर हाँस्पिटल मध्ये अड्मिट असलेल्या आढाव नावाच्या व्यक्तीने सुपर हाँस्पिटल च्या छतावरुण उड़ी घेउन स्वताच जीवन संपाविन्याचे प्रयत्न केले प्रथम दर्शनी लोकांनि आमच्या प्रतिनिधीशि बोलतांना सांगीतले की आढाव नावाच्या व्यक्तिचा जागेवर मृत्यु झालेले आहें तेव्हा आमच्या प्रतिनिधिने हाँस्पिटल मधे सम्पर्क केले असता आढाव यांचीं प्रकृति अत्यंत नाज़ुक आहें असे समजले आढाव यांनि का जीवन संपवन्याचा प्रयत्न केले हे आजुन गुलदसत्यातच आहें परंतु याची उलटसुलट चर्चा सध्या शिर्डीत चालु आहें

बुलढाणा -  28 सितंबर
पारिवारिक बेबनाव के कारण पत्नी अपने मायके रहने लगी थी किंतु पति ने बात करने के बहाने घर में बुलाया और पत्नी की इच्छा के खिलाफ ज़बरदस्ती शारीरि संबंधित बनाएं, पत्नी की इस शिकायत के बाद आरोपी पति तथा सास के खिलाफ बुलढाणा शहर थाने में विभिन्न धाराओं के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.
      पुलिस से मिली जानकारी के अनुसार बुलढाणा के मिर्ज़ानगर निवासी आरोपी अकबर खान नाजिमा खान के साथ पीडिता का विवाह 2 नवंबर 2016 में हुआ था. आरंभ काल ने सब कुछ ठीक था किंतु बाद में पति और सास ने मायके से 2 लाख रूपये लाने को कहा,मायके की आर्थिक स्थिति कमजोर होने के कारण पीड़िता ये मांग पूरी नही कर पाई जिसके बाद उसे शारीरिक व मानसिक रूप से प्रताड़ित किया जाने लगा.पति अकबर खान ने 3 माह में ही पत्नी को घर से बाहर निकाल दिया तब से पीडिता अपने बुलढाणा स्थित मायके में रहने लगी थी.पीड़िता ने कोर्ट में पिटीशन दायर की है तब से पति फोन पर मीठी बातें कर घर ले जाने की बात कर रहा है.21 जनवरी 2019 को आरोपी ने पीड़िता को मिलने के लिए अपने घर ले गया और बेडरूम में ले जा कर इच्छा के विरुद्ध ज़बरदस्ती शारीरिक संबंध स्थापित किया और जान से मारने की धमकी दी.पीडिता की इस शिकायत के बाद बुलढाणा शहर थाने में आरोपी पति अकबर खान नाजिमा खान व सास नाजिमा खान के खिलाफ भादवी की धारा 498-A,376-B,323,504,506,34 के तहत विगत 19 सितंबर को अपराध दर्ज कर लिया गया है.दोनों आरोपी अब तक पुलिस की गिरफ्त में नही आए हैं.मामले की अधिक जांच थानेदार शिवाजी कांबले कर रहे हैं.


डेंग्यु ताप सावधानता बाळगा डॉक्टर सलीम शेख
भारतात जवळ जवळ साथीचे आजार उद्भवतात आशिया आफ्रिका खंडात साथीचे आजार वारंवार डोके काढत असतात व गावच्या गाव साथीच्या कचाट्यात सापडतात व त्यामध्ये  फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा होते त्यामध्ये डेंगू ताप हासुद्धा एक घातक रूप घेत आहे सध्या तो महाराष्ट्रात आंध्र ,कर्नाटक ,आसाम या राज्यात धुमाकूळ घालत आहे आता सध्या पुणे व औरंगाबाद शहरात धुमाकूळ घालतोय व कधीकधी आपल्या अहमदनगर श्रीरामपूर जिल्ह्यात त्याचे रुग्ण आढळतात सध्या पावसाचे दिवस आहेत त्याचप्रमाणे कधी किती वाढेल हे बिलकुल सांगता येत नाही त्याचा प्रसार कमी व्हावा हाच हेतू जनजागृती व्हावी ही आजची गरज प्रथम 1950 मध्ये दक्षिण आशिया व आफ्रिका येथे हा व्हायरस सापडला व नंतर तो क्युबा व अमेरिका या देशात पसरला हा व्हायरस चिकुन गुनिया  ज्या अँडीस नावाच्या जातीच्या डासांपासून होतो त्या तासांपासून डेंगू होतो हे डास चांगल्या वातावरणात चांगल्या स्वच्छ पाण्यात स्वच्छ डबक्यात स्वच्छ व निर्मळ वातावरणात आपले वास्तव करतात याचे पैदास प्रजनन व संगोपन हे चांगल्या पाण्यात व वातावरणात करतो व आठवड्यात याची पूर्ण वाढ व सक्षम म्हणून श्वास घेण्यास सुरुवात करतो अर्थात तयार राहतो याचे एक विचित्र पद्धत आहे तो फक्त दिवसातच चावा घेतो म्हणजे हा पूर्ण कार्यालयीन काम करतो
लक्षणे:- यामध्ये एकदम ताप येतो मळमळल्यासारखे होते कधीकधी उलट्या होणे डोके फार दुखणे डोळ्यात लाली येउन डोळ्यांमध्ये फार दुखणे डोळ्यांची उघडझाप करताना वेदना होणे सर्दी होणे भरपूर थंडी वाजून येणे अंग हात पाय खुप खुप दुखणे जबरदस्त कंबर दुखणे शरीरातील गाठी वाढतात व त्यावर सर्व शरीरावर लालसर चट्टे व पुरळ येणे ही लक्षणे सर्वात महत्वाचे डेंगू मध्ये असतात तसेच महत्त्वाचे लक्षण म्हणजे तोंडामध्ये लालसर चट्टे येतात नंतर पायावर चट्टे येउन संपूर्ण अंगावर  माशी पसरतात संपूर्ण शरीर लालसर गथील चावल्यासारखे होते ही सर्व प्रक्रिया शरीरांतर्गत चालू असते ती 3 ते 5 दिवसांपर्यंत चालू असते त्या नंतर पहिल्या लक्षणासारखीच लक्षणे पुन्हा पुन्हा उद्भवतात परंतु त्याची तीव्रताही कमी प्रमाणात असते
डेंगू चा प्रकार:- म्हणजे (डेंगू हीमोरेजीक फियर) अर्थात डेंगू रक्त भावी ताप हा प्रकार असेल तर धोकादायक असतो यामध्ये धोका होण्याची अत्यंत शक्यता असते या प्रमुख्याने शरीरातून एकदमच रक्तस्राव चालू होतो नाकातून तोंडातून शौचावाटे रक्‍त वाहू लागते झिरपू लागते रुग्ण एकदमच गळुन जातो बेशुद्ध अवस्थेत जातो ही अवस्था अत्यंत घातक असते धोकादायक असते ही अवस्था तिसऱ्या किंवा पाचव्या दिवसापासून होते कारण रुग्णांचे निदान लवकर न झाल्याने त्यामध्ये पांढरे पेशी कमी होणे व प्लेटलेट्स फार प्रमाणात कमी होऊन  थ्रम्बोसावटोपेनीया ल्युकोसाबटोसीस व रक्त गोठण्याची प्रक्रिया कमीकमी होते हे सर्व प्रक्रिया फेल हो जाते व रुग्ण दगावण्याची शक्यता येते.
खबरदारीचा उपाय:- डेंगू चे पहिल्याप्रथम सामाजिक कार्य म्हणून जनजागृती करावी नागरिकांनी एक सामाजिक कर्तव्य समजून आपल्या घराच्या परिसरातील परिसर स्वच्छ करावा त्यामध्य डबके ते बुजवावे व ते स्वच्छ करून निर्जंतुक करावे पाणीसाठल्यास ते स्वच्छ करून फेकून देऊन त्यामध्ये डासांचा साम्राज्य होणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या घरातील हौद स्वच्छ करावा गटारी पहिल्याप्रथम स्वच्छता ठेवावे त्या गटारी मध्ये त्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी करावी गार्डन बगीचे झाडे असल्यास त्यावर कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी रात्री झोपताना स्वच्छ मच्छरदाणीचा वापर करावा किंवा मच्छर च्या वेगवेगळ्या प्रकारचे बाजारात मच्छर प्रतिबंधक भेटतील ते वापरावे जेणेकरून पहिल्याप्रथम आपल्या स्वतःची काळजी घेता येईल आपल्या अगर आपल्या शेजारी किंवा कामगारांना याची लागण दिसल्यास शक्यता लवकरात लवकर आपल्या नजीकच्या किंवा फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा व त्वरित उपचार करावे आपल्या सरकारी आरोग्य केंद्रास किंवा नगर परिषद कार्यालयात याची नोंद घ्यावी जेणेकरून ते कीटकनाशकांची फवारणी करण्यास प्राधान्य देतील अशाप्रकारे प्रशासनास सहकार्य करावे व पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न करावा
डॉक्टर सलीम शेख बैतूश्शिफा हॉस्पिटल श्रीरामपूर.

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.27, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी शिवसेनेच्या युवासेना मध्ये सहभागी होवून ऐतिहासिक चळवळीचे साक्षीदार बनावे असे आवाहन युवानेते अब्दुल समीर यांनीं केले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील शिवना सर्कल मध्ये युवासेनेच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अब्दुल समीर यांनी विविध गावांत बैठका घेवून युवकांशी संवाद साधला.
 अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात युवकांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदारसंघातील युवासेनेने निर्धार केला असल्याचे अब्दुल समीर यांनी युवकांशी संवाद साधताना स्पष्ठ केले.
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ अब्दुल समीर यांनी सोयगाव तालुक्यातून पदयात्रेला सुरुवात केली आहे. सोयगाव मध्ये जवळपास 100 किलो मीटर पदयात्रा पूर्ण करून समीर यांनी सिल्लोड तालुक्यात पदयात्रेला सुरुवात केली आहे. त्यांच्या पदयात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 शिवना सर्कल मध्ये आयोजित पदयात्रेस
शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, देविदास लोखंडे, पंचायत समिती सदस्य सलीम शेख,मुरलीधरराव काळे,उपतालुका प्रमुख सुभाष करवंदे,सर्कल प्रमुख सुधाकर काळे, राजुमिया देशमुख, राजरत्न निकम, शेख सलिम, सुधाकर बनकर, पंजाबराव चव्हाण, भास्कर बनकर, रुद्राजी इंगळे, लक्ष्मण गव्हाणे, नाना गव्हाणे, अकिल देशमुख, रमेश चव्हाण, राजेश्वर आरके, जगन ठाले, गोविंदा गव्हाणे, तानाजी गव्हाणे, गणेश गव्हाणे, पंढरीनाथ चव्हाण, उपविभाग प्रमुख उत्तम भागवत, श्रावण गिरी, शिवा टोम्पे,गणेश राणा काळे,दादा पाटील काळे,संदीप राऊत,इस्माईल कुरेशी,शामराव लोखंडे,गणेश सपकाल,रावसाहेब काळे,विनायक काटकर,सुनील सपकाल,किरण दहितकर,सखाराम धनवई, दीपक वाघ, अमोल बोराडे,

बुलडाणा - 28 सप्टेंबर
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील बोर्डि नदी मध्ये 15 वर्षीय मुलगा सेल्फी काढत असतांना तोल जाऊन पडला व पाण्यात वाहून गेल्याची घटना आज 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
      मागील 4-5 दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.आज खामगाँव तालुक्यातील सुटाळा खुर्द या गावा जवळ वाहणारी बोर्डि नदीवर बाँधलेल्या बँधाऱ्यावर आज सकाळी 4-5 विद्यार्थी पोचले व सेल्फी काढत असतांना हेमंत राजेश जागींड वय 15 वर्ष याचा तोल सुटुन तो खाली नदित पडला,दुथडी भरूण वाहणारी नदीच्या पाण्यात हेमंत वाहून गेला,अशी माहिती त्याचे मित्रांनी दिल्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहोचले तसेच पोलिसही दाखल झाली असून हेमंतचा शोध सुरू आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या फेरचौकशीसाठी शासनाने नगर महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली आहे. ही समिती या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार आहे. नव्याने नियुक्त केलेल्या फेरचौकशी समितीला अहवाल सादर करण्यास तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी नगरपालिका भुयारी गटार प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या परवानगीने याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झालेला आहे. याबाबत पहिल्या चौकशी समितीने ठपका ठेवलेले तत्कालीन मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सुमंत मोरे तसेच तत्कालीन बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.त्यात वर्ग 1 च्या अधिकार्‍यांची चौकशी वर्ग 2 चे अधिकारी करू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्याला अनुसरून शासनाच्या नगर विकास विभागाने 17 सप्टेंबर रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालकांना पत्र दिले होते. त्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी मुख्याधिकारी शिर्डी नगरपंचायत यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत केलेल्या चौकशीत सकृतदर्शनी त्रुटी दिसून येत आहेत. या अभियानाचे नोडल अधिकारी या नात्याने आपल्यामार्फत फेर चौकशी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.त्यानुसार या संदर्भातील फेरचौकशी तीन महिन्यात करून तसा अहवाल शासनाला सादर करावा.तसेच फेरचौकशी अहवाल प्राप्त होऊन त्यावर निर्णय होईपर्यंत यापूर्वीच्या जिल्हा स्तरावरील चौकशी अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. परिणामी तोपर्यंत जिल्हास्तरावरून मुख्याधिकारी शिर्डी नगरपंचायत यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल स्थगित राहील असेही म्हटले आहे. ही शासनाची भूमिका उच्च न्यायालयात मांडावी असेही सूचित करण्यात आले होते.त्यावर 19 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानेही जुन्या समिती अहवाल स्थगित ठेवला आहे. या सर्व निर्देशानुसार नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहरे यांच्या सहीने 25 सप्टेंबर रोजी फेरचौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार फेर चौकशी समितीचे अध्यक्ष अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांचे अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहाय्यक संचालक संजय दुसाने, औरंगाबाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग आदींची फेरचौकशी समिती नियुक्त केली आहे.

नाशिक । प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरातहून जिल्ह्यात येणारा 26 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. तसेच, दिव व दमण येथील मदयसाठा हस्तगत केला आहे. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन म्हणून याचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता जारी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.27) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूका शांततेत व सुरळित पार पडाव्या यासाठी पोलिसांकडून सुरु असलेल्या ऑपरेशनची त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात 50 कुख्यांत गुंडाची दोन वर्षासाठी तडीपारी करण्यात आली आहे.अनेक गुंडांवर ‘एमपीडीए’ कायदयानूसार कारवाई केली जात आहे. फरार आरोपींना पकडण्याची मोहीम सुरु आहे. निवडणुकीत मदय, पैसा व इतर प्रलोभनाचा वापर होऊ नये यासाठी चेक पोस्टवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारावर सायबर सेलची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले. शहर हद्दीत 116 तडीपार शहर हद्दीत 116 जणांवर तडीपारीची तर 10 गुंडांवर ‘एमपीडीए’ची कारवाई केल्याची माहिती लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. 128 गुंडांविरुध्द अजामीनपात्र नोटीसा काढण्यात आल्या आहे. शहरातील 11 ठिकाणी अवैध मदय विक्रीवर छापे टाकण्यात आले. देशी कट्टे, काडतूसे व एक तलवार जप्त करण्यात आली आहे. संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे

सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२७) - सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यावरील एस एस डी शूज ही  दुकाने जळून खाक झाली आहे. या जळीत दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झालेले आहे. आगीचे कारण नेमके काय आहे, समजलेले नसले तरीही विजेच्या शॉक सर्किटमुळे या दुकानांना आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या शहर पोलीस स्टेशन व नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एस एस डी शूज या दुकानांला मध्यरात्रीच्या अडीच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली असल्याचे समजल्यावर त्याच रस्त्यावर असलेल्या एका दुकानदाराने तातडीने धावत जाऊन पोलिसांना माहिती दिली पोलीस यंत्रणा लगेच घटनास्थळी पोहचल्यावर निवडणूक काळात आयटीआय शाळेच्या मैदानात उभे असलेली अग्निशमन गाडी काही मिनिटांत घटनास्थळी पोहचली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलीस प्रशासनाच्या मदतीला मोठ्या प्रमाणात नागरिक धावून आले. नगर परिषदेच्या अग्निशमन बंब्याच्या मदतीने व आसपासच्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आग विझविण्यासाठी खूप जिकरीचे प्रयत्न केले, परंतु आगीचा फडका इतका मोठा व भयानक होता की, एस एस डी शूज ही दुकान जळून खाक होईपर्यंत आगीचा बोंब शमला नाही. या घटनेत ईतर दुकानांना आगीचा फटका बसू नये म्हणून, संभाव्य धोका लक्षात घेत तातडीने आसपासच्या दुकानातील सामान बाहेर काढून दुकाने खाली करून घेतल्याने पुढील अनर्थ मोठा धोका टळला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात येवले चहा अति कमी वेळात प्रसिद्द झालेल्या येवले यांचि जागोजागी शाखा आहेत जालना येथून बातमी प्रसिद्द झाली असता अन्न औषध प्रशासन म.रा. पुणे यांनि येवले फ़ूड प्रोडक्शन पुणे येथे छापा टाकुन चहा पावडर व चहा मसाला जप्त करूण तपासनी साठि प्रयोग शाळेत पाठवले आहें त्यात काय तथ्य आढळते ते लवकरच समोर येइलच परंतु प्रथम तपासी अधिकार्यांनि ही क़बूल केले की येवले यांनि नियम डावलून कायद्याच भंग केले आहें प्रयोग शाळेतून तर सत्य समोर येइलच परंतु येवले याँच्या सर्व शाखा आजुनही चालुच आहेत आजुनही लोकांच्या जीवाशी येवले यांचा खेळ चालूच आहें तेव्हा मेहरबान साहेबांनि प्रयोग शाळेचा अहवाल जो पर्यन्त येत नाही तो पर्यन्त शरीराला घातक असलेले येवले चहा चे सर्व स्टॉल त्वरित बंद करन्यास विशेष विनंती आहें। असे शिर्डीतिल समाज सेवक जितेश लोकचंदानी यांनि मुख्य सचिव याँच्या कड़े नीवेदना द्वारे केली आहें.

बुलडाणा - 26 सप्टेंबर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर भाजपा मध्ये जाणार अशी चर्चा राज्यात बऱ्याच दिवसापासुन  जोर धरू लागली आहे.शेवटी आज तुपकरांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्याकडे पाठविला असून याबाबत विचारना करण्यासाठी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे, मात्र तुपकर पुढील निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती सूत्राकडुन मिळाली आहे.

सिल्लाेड दि.२५
सिल्लाेड येथे बुधवार(दि.२५)राेजी झालेल्या महीला संवाद यात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला.शिवसेनेचे सचीव  तथा हाेम मिनिष्टर फेम आदेश बांदेकर यांच्याशी संवाद साधतांना महीलांच्या सक्षणासाठी कठाेर कायदे करण्याची मागणी यावेळी महीलांनी केली.शहरातील छस्तीस एकर प्रांगणात झालेल्या संवाद यात्रेस महीलांची लाक्षनीक उपस्थीती हाेती.
कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज ,शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,माताेर्षी मिनाताई ठाकरे यांच्या   प्रतिमा पुजनाने झाली.  माजी मंत्री अब्दुल सत्तार ,आमदार अंबादास दानवे,जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी  ,जिल्हापरीषदेच्या अध्यक्ष देवयाणी डाेणगावकर,जिल्हापरीषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे,नगराध्यक्षा राजश्री निकम,उपजिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण,तालुका प्रमुख किशाेर अग्रवाल, देवीदास लाेखंडे,जिल्हापरिषद सदस्य सिमा गव्हाणे,रेखा जगताप, महीला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखाताई वैष्णव,किसान सेनेचे सुरेश आहेर,शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे,सुदर्शन अग्रवाल आदिंची यावेळी उपस्थीती हाेती.
आदेश बांदेकर यांनी संवाद साधतांना महीलांना बाेलते केले.अनेक महीलांनी आम्ही तुम्हाला टिव्हीवरच आतापर्यंत पाहीले.आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटन्याची संधी आल्याचा आनंद व्यक्त केला.सिल्लाेड शहराचा विकास माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरपुर केला फक्त शहरात मुलासाठी क्रिंडागणाची गरज व्यक्त केली.महीलांनी श्री.बांदेकर यांना प्रश्न विचारत संवादात प्रगल्बधतता आनली.
सुसंकृत्रपणा आवडल्याने शिवसेना निवडली !
दरम्यान एका शाळकरी मुलीने अभिनेता बांदेकर यांना आपण शिवसेना पक्षच का निवडला.यावर उत्तर देतांना बांदेकर यांनी मुबंईत लहानपनातच वावरतांना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राजकारणातील सुसंस्कृतपना मला भावला . राजकारण करतांना शिवसेनेचे  समाजकारण न्याय देनारे असल्याने मी शिवसेना निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - दि. २५ सप्टेंबर २०१९
सन २०१८- २०१९ मध्ये हवेतील साहसी क्रीडा प्रकारात उत्कृस्ट कार्य केले बद्दल नवी दिल्ली येथील एअरो क्लब ऑफ इंडिया च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क्लब चे अधक्ष्य कॅप्टन राजीव प्रताप रुडी यांचे हस्ते महाराष्ट्र राज्यातील तिघांना सन्मानित करण्यात आला. त्यामध्ये पॅरा मोटरिंग साठी अहमदनगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, पॅरा जम्पिंग साठी पुणे येथील पद्मश्री शितल महाजन आणि देश्यातील सर्वोत्कृष्ट क्लब म्हणून मुंबई फ्लायिंग क्लब चा समावेश होता.
आप्पासाहेब ढुस यांनी २.५ लिटर पेट्रोल मध्ये पॅरा मोटर च्या साह्याने थायलंड मधील  जागतिक स्पर्धेत ३४ किलोमीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम नोंदविल्या बद्दल ढुस यांना सन्मानित करण्यात आले, तर जगातील सात ठिकाणी पॅरा जंप करून विक्रम नोंदविल्या बद्दल पुणे च्या शीतल महाजन यांचा सन्मानित करणेत आले.
 तसेच हवेतील साहसी क्रीडा प्रकारात काम करणारा देश्यातील सर्वोत्कृष्ट क्लुब ठरल्या बद्दल मुंबई फ्लायिंग क्लब ला सन्मानित केले.

बुलडाणा- 25 सप्टेंबर
बुलडाणा तालुक्यात आज 25 सेप्टेंबरला सायंकाळ पासून जोरदार पाऊसाची बैटिंग सुरु असून पैनगंगा नदीला मोठा पुर आलेला आहे. देऊळघाट व पलसखेड़ नागो, कोलवड, सागवन, येळगांव लगतच्या पैनगंगा नदीवरील पूलावरुण पुराचा पाणी वाहत आहे.पैनगंगेला आलेल्या या पूरा मुळे बुलडाणा-चिखली, बुलडाणा-अजिंठा,बुलडाणा-धाड,बुलडाणा-रायपुर हे 4 मुख्य मार्ग बंद झालेले आहे. येळगांव धरण ओवरफ्लो झाला असून सदर पाणी खालच्या भागात म्हणजे पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पात जात आहे.बुलडाणा तालुक्यातील तांदूळवाडी या गावा जवळ पुराच्या पाण्यात 2 बाइक वाहून गेली सुदैवाने बाइक वरील माणसा सुरक्षित आहे.पैनगंगा नदी काठच्या गावात सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)  सावेडीतील बालिकाश्रम रस्त्यावर भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी पस्तीस हजारांचा ऐवज लंपास केला. काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली.मंगल सखाराम पंडित या महिलेने पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांच्याच घरात चोरी झाली. पंडित या बालिकाश्रम रस्त्यावरील आर्यन गार्डनच्या डी विंगमध्ये राहतात. दुपारी एक वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केला.



बुलढाणा - 25 सितंबर
बुलढाणा जिले की चिखली विधानसभा से 2 बार काँग्रेस विधायक व काँग्रेस के बुलढाणा जिलाध्यक्ष राहुल बोन्द्रे भाजपा में प्रवेश लेने जा रहे है,,ऐसी ये खबर सोशल मीडिया के माध्यम से  चिखली में फैलते ही भाजपा के जुने कार्यक्रता रास्ते पर उतर आए है.विधायक बोन्द्रे को भाजपा में ना लिया जाए,इस मांग को ले कर चिखली के शिवाजी चौक में आंदोलन किया गया.इस समय भाजपा जिला उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत ने कहा कि,कार्यकर्ता इस लिए नाराज़ है कि,जिस कांग्रेस के विधायक ने पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ अपशब्दों का इस्तेमाल किया है उसे पक्ष में प्रवेश देकर उम्मीदवारी देना उचित नही है.भाजपा में मेगा भरती हो रही है ऐसे में यदि कांग्रेस विधायक भाजपा में प्रवेश लेते है तो हमे कोई आपत्ति भी नही किंतु उन्हें प्रत्याशी ना बनाया जाए,ऐसी इच्छा भी उन्होंने सभी आंदोलन कर रहे भाजपा के निष्ठावान कार्यकर्ताओं की ओर से कहा है.बता दे कि चिखली से भाजपा की ओर से चुनाव लडने के लिए जिला परिषद सभापति श्रीमती श्वेताताई महाले, एड.विजय कोठारी,सुरेशअप्पा खबूतरे आदि इच्छुक है.विधायक बोन्द्रे के इस राजकीय दांव ने स्थानिक भाजपा के खेमे में खलबली मचा दी है.


मेरी बदनामी के लिए भाजपा का गेम प्लान!विधायक बोन्द्रे

पिछले 4 महीने से चर्चा कर रहे हैं ये लोग,ये भाजपा का ही गेम प्लान है मुझे जबरदस्ती बदनाम करने का,अपना ऐसा कोई इरादा नही है,अपन पार्टी में ही है,पार्टी के ही है और पार्टी के ही रहेंगे,ये क्लियर अपना स्टैंड है, ऐसा विधायक राहुल बोन्द्रे ने फोन पर अपनी प्रतिक्रिया देते हुए व्यक्त किया है.

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लावलेल्या नाकाबंदीत बेहिशोबी रक्कम घेऊन जाणार्‍या राहुरी येथील व्यापार्‍याकडून 2 लाख 70 हजार रुपये महिंद्रा कंपनीच्या जितो या गाडीतून हस्तगत केले. सदरची रक्कम फ्लाईंग स्कॉड व स्टँटी पथकाच्या ताब्यात देऊन राहाता तहसीलदारांकडे कारवाई करण्याकरिता पाठवून देण्यात आली.आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाहतूक, तसेच बेहिशोबी रक्कम व मौल्यवान वस्तू घेऊन जाणार्‍यांवर कारवाई करता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग व नाकाबंदी लावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, यांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सुचनेनुसार, शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, पोलीस उपनिरीक्षक जाने, पोलीस नाईक़ जी. ई. सोनवणे, पी. डी. अंधारे, श्री. कुर्‍हे, पोलीस कॉन्स्टेबल मैंद, श्री. पंडोरे तसेच चार होमगार्ड या पथकाने शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करत असताना शिर्डी शहरातीन आरबीएल चौकात लावलेल्या नाकाबंदीत एक महिंद्रा कंपनीची जितो गाडी राहात्याकडून येत असतांना तिला थांबवून गाडीची तपासणी केली असता चालकासोबत असलेल्या राहुरीतीलच व्यापार्‍याच्या ताब्यातून 100 रुपयाच्या 1600 नोटा, 500 रुपयाच्या 200 नोटा, 20 रूपयाच्या 200 नोटा 10 रुपयाच्या 600 नोटा असे मिळून एकूण 2 लाख 70 हजार रुपये मिळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून या रकमेबाबत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळून आले नाही. त्यामुळे सदर पथकाने सदरची रक्कम जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या फ्लाईंग स्कॉड व स्टँटी पथकाच्या ताब्यात देवून राहाता तहसीलदारांकडे कारवाई करण्याकरिता पाठवून देण्यात आली.

बुलडाणा - 24 सप्टेंबर
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका कृषि कार्यालयात कार्यरत महिला कृषी सहाय्यक याचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केल्याची घटना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच सोमवारी घडली असून याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध आज 24 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडित महिला कृषी सहाय्यक यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की 23 सप्टेंबर रोजी मोताळा येथे तालुका कृषी अधिकारी के.एल. कंकाळ यांनी फिर्यादीला सोमवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास आपल्या कॅबिनमध्ये बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला व घरी कोणी नसताना मला बोलव असे म्हणून शरीर सुखाची मागणी केली, तसेच लज्जास्पद बोलत अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकारामुळे पिडीत महिला कर्मचारी गोंधळुन आरोपीचा हात झटकला. तसेच सदर प्रकार नवऱ्याला सांगते असे म्हटल्यावर आरोपीने प्रशासकीय कारवाईची धमकी दिली. तसेच तू बुलडाणा येथून ये-जा करते, तुला उडवून देईल, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी उपरोक्त तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी तालुका कृषी अधिकारी के.एल.कंकाळ याच्याविरुद्ध भादविची कलम 354 (अ), 506 अन्वय गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गरुड यांच्या मार्गदर्शनात एएसआय गजानन वाघ करीत आहेत.ही घटना समोर आल्या नंतर जिल्ह्यातील कृषि विभागात एकच खळबळ उडालेली आहे.


अहमदनगर (प्रतिनिधी)  बारा वर्षाच्या मुलीसोबत अश्‍लील चाळे करणार्‍या पित्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनीत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसात विकृत पित्याविरोधात 354(अ),सह बालकांचे लैंगिक अपरथाचे संरक्षण अधिनियम 2012 चे क 8,9(छ)/10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्य कॉलनीतील या दाम्पत्याला एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. रविवारी रात्री हा विकृत पिता घरी आला. अंगावरील शर्ट काढून त्याने मुलगा आणि मुलगी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर त्याने मुलीला उचलून दुसर्‍या खोलीत नेले. तेथे तिच्याशी अश्‍लील चाळे करत नको त्या ठिकाणी हात लावला. जवळ ओढून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पत्नीने पतीविरोधात दिली आहे. भिंगार पोलिसांनी त्या विकृत पित्याविरोधात गुन्हा दाखल केला

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget