राहुरी (तालुका प्रतिनिधी)-राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या कोम्बीग ऑपरेशन मोहिमेत भरत अशोक चितळकर हा अट्टल गुन्हेगार जेरबंद केला. त्याचे दोन साथीदार पोलिसांना पाहताच पसार झाले. चितळकरवर राहुरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.राहुरी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन बागुल, पोउपनि. गणेश शेळके तसेच दहा पोलीस कर्मचारी व दोन महिला कर्मचारी यांनी ही मोहीम राबविली. राहुरी पोलिसांच्या धडक कारवाईमुळे बारागाव नांदूर परिसरातील पसार गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना भरत चितळकर यास पाठलाग करून पकडण्यात आले. चितळकर याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 237/19 नुसार भादंवि. कलम 399, 402 अन्वये, तसेच राहुरी पोलीस गुन्हा रजिस्टर क्रमांक 621/19 नुसार भादंवि. 399, 402 अन्वये व सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 331/19 नुसार भादंवि 395 (नुकताच पेट्रोल पंपा नजिक घडलेला दरोडा ) असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, चितळकरला बेड्या ठोकल्याने आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
Post a Comment