Articles by "crime"

श्रीरामपूर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील (IPS) २०१६ तुकडीचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे त्यांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवैध धंद्यांवर लगाम बसल्याची उदाहरणे आहेत. मात्र, श्रीरामपूर शहरातील सध्याची परिस्थिती पाहता, येथील अवैध साम्राज्याला वेसण घालणे हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आणि कसोटी ठरणार असल्याचे चित्र आहे.

​श्रीरामपूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायाच्या आडून वाहनांची बेकायदेशीर कत्तल (स्क्रॅपिंग) केली जात आहे. परिवहन विभागाची (RTO) कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा काळा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. केंद्र शासनाने जुनी आणि भंगार वाहने मोडीत काढण्यासाठी अधिकृत स्क्रॅप केंद्रे सुरू केली असताना, श्रीरामपुरातील हे अवैध व्यावसायिक सुट्या भागांच्या (Spare Parts) विक्रीसाठी आरटीओ कार्यालयाबद्दल चुकीची माहिती देऊन नागरिकांची उघड फसवणूक करत आहेत.

​त्याहून गंभीर बाब म्हणजे, या गाड्यांच्या पार्टसचा वापर करून दुसरीच बेकायदेशीर गाडी तयार केली जाते आणि ती विकली जाते. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचणे सोपे जाते आणि गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांसमोर प्रचंड अडचणी निर्माण होतात.

​या अवैध स्क्रॅपिंग मार्केटमध्ये रात्रीच्या अंधारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. चांगल्या दर्जाची वाहने रात्रीतून भंगार करून, त्यांचे तुकडे करून गाड्या भरून रवाना केल्या जातात. यामध्ये अनेक गाड्या चोरीच्या, बँकांचे कर्ज बुडवून आणलेल्या किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या असण्याची दाट शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रक्रियेतून थेट गुन्ह्यांचे पुरावेच नष्ट केले जात असल्याचा संशय नाकारता येत नाही.

​सर्वसामान्य नागरिकांना आणि डोळस जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसणारा हा ‘गुन्हेगारीचा कारखाना’ प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि कायदा शिकलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना का दिसत नाही? हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

"स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक शहरात नेमके काय करायला येते?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​हा व्यवसाय काही प्रभावशाली घटकांच्या छत्रछायेखाली आणि प्रशासनाच्या आर्थिक फायद्यापोटी वतत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलीसच गुन्हेगारांना 'माल पसार' करण्यास मदत करतात की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.

नव्या सिंघम’कडून कारवाईची अपेक्षा!

​नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा भूतकाळातील धडाका पाहता, ते श्रीरामपूरमधील या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क मोडून काढणार का? स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर-तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या धाकाने तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येणार की नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण तडजोडी करून हे अवैध व्यवसाय असेच सर्रास सुरू राहणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​धडाकेबाज एसपी मुम्मका सुदर्शन या 'भंगार माफियांच्या' मुसक्या आवळून श्रीरामपूरला गुन्हेगारीमुक्त करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील एका मोबाईल दुकानात फोड करून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातून सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ७ परिसरातील रहिवासी व मोबाईल दुकान व्यावसायिक राकेश काटारिया (वय ३२) यांच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून विविध मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरी केल्या होत्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१ (३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना तपास पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १) बलदेव सिंग मंचर सिंग टाक (वय २०) व २) विशाल भरत बोरुडे (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मोबाईल अ‍ॅक्सेसरीज जप्त केल्या.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपनीचे मोबाईल चार्जर, इअरबड्स, हेडफोन, डेटा केबल, कार चार्जर, स्पीकर व इतर साहित्याचा समावेश असून एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेका / जयवंत तोडमल, पोहेकों/भागवत शिंदे, पोकों/संपत बडे, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/संभाजी खरात, पोकों/सागर बनसोडे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/सचिन दुकळे, पोकॉ रामेश्वर तारडे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/पांडुरंग चौधरी, पोकों/गणेश तुपे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/जयवंत तोडमल हे करीत आहेत.


बेलापूर ( प्रतिनिधी)-देव अंगात संचारला असे भासवून काही भोंदू बाबा आलेल्या भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याच्या बेलापूर व परिसरात चर्चा सुरू असुन अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबा संदर्भात काही तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसच्या  राज्य सचिव एडवोकेट रंजनाताई गवांदे, बाबा आरगडे ,देविदास देसाई यांनी केले आहे.       या बाबत अंनिसच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात गवांदे, आरगडे ,देसाई यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महीलांचे लैंगिक शोषण केल्याची परिसरात चर्चा असुन बाबांच्या भितीपोटी व इज्जतीमुळे महीला तक्रार देण्यास पुढे येत नाही.ज्या महीलांची आर्थिक शारीरिक फसवणूक झाली असेल अशा महीलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी अथवा पोलीस 

स्टेशनमध्ये संपर्क साधावा त्या भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन त्याचेवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल . संबंधित भोंदू बाबा विरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने अंनिसने पावले उचलली असुन त्या भोंदू बाबाने आलेल्या भक्तांकडून मोठ्या रकमा वसुल केल्या असल्याची ही परिसरात चर्चा असुन या बाबाकडे येणाऱ्या मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचा भरणा आहे.  राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली हा बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाली असुन त्या भोंदू बाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावे देखील उघड केली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर अंनिसच्या राज्य सचिव अँड रंजना ताई गवांदे ,बाबा आरगडे, देविदास देसाई ,छायाताई बंगाळ आदिच्या सह्या आहेत.


शिर्डी : शिर्डीतील एका हॉटेलच्या भाडेकरार वादप्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हॉटेल मालक सुनील तोलानी यांच्या मुलास नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही दिवसापूर्वी नागपूर पोलिसांची टीम शिर्डीत दाखल होऊन संबंधित कारवाई केल्याचे समजते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आर्थिक व्यवहार आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाडेकरारातील अटी, आर्थिक देवाणघेवाण तसेच तृतीय पक्षाशी झालेले व्यवहार याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर येथील बजाज नगर परिसरातील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधितास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झाले नसले तरी या घडामोडीमुळे संबंधित प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयीन निर्णयानंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.


शिर्डीतील हॉटेल व्यवहारात ‘भाडेकरार’च्या नावाखाली कोट्यवधींची सावली; नागपूर कनेक्शनमुळे प्रकरण तापले

शिर्डी येथील व्यावसायिक सुनील तोलानी यांच्या हॉटेलसंदर्भात उघड झालेल्या आर्थिक वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. नागपूर येथील एका व्यावसायिकाने हॉटेल भाड्याने घेतल्याचा आभास निर्माण करून काही नागरिकांकडून पैशांची उकळपट्टी केली, थकीत रक्कम न भरता पलायन केले आणि उलट हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या घडामोडींमुळे शिर्डी–नागपूर व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

५ लाखांवरून ३ लाखांवर ठरलेली ठेव; कराराआधीच अटी बदलण्याचा खेळ

जानेवारी महिन्यात रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीदरम्यान संबंधित व्यावसायिकाने जागा भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला ५,००,००० रुपये ठेव व ६०,००० रुपये मासिक भाडे अशी स्पष्ट अट ठेवण्यात आली होती. मात्र मैत्रीच्या नात्याने आणि मदतीच्या भूमिकेतून अटी शिथिल करत ३,००,००० रुपये ठेव व ५०,००० रुपये मासिक भाडे असा तडजोडीचा निर्णय झाला.

कराराची तोंडी पुष्टी देत “मी सर्व जबाबदारी स्वीकारतो” असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ठेवीपोटी केवळ ९८,००० रुपयेच अदा करण्यात आले. उर्वरित २,०२,००० रुपये तसेच तीन महिन्यांचे भाडे थकवण्यात आले. करार अंतिम होण्यापूर्वीच आर्थिक शिस्त ढासळल्याचे स्पष्ट झाले.

२४ जूनचा करार; ‘गाडीत पैसे आहेत’ म्हणत नागपूरला पलायन

२४ जून रोजी कोपरगाव येथे औपचारिक करार करण्यात आला. त्या वेळी २,५०,००० रुपये (२ लाख ठेव + ५० हजार भाडे) देणे अपेक्षित होते. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर संबंधिताने “पैसे गाडीत आहेत” असे सांगून सर्वांना बाहेर बोलावले. काही क्षणातच विधान बदलत “पैसे शिर्डीत विसरलो” असे कारण देत तो थेट नागपूरला रवाना झाला.

या घटनेनंतर काही दिवसांनी तो परत आला आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र थकीत रक्कम भरल्याशिवाय परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका तोलानी कुटुंबाने घेतली.

खोट्या नोटिसा, बनावट तक्रारी आणि दबावतंत्राचा आरोप

थकीत रक्कम न भरता उलट संबंधिताने लाईट मीटर नसल्याची खोटी नोटीस पाठवली. प्रत्यक्षात मीटर आधीच बसवलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर बजाज नगर पोलिस ठाण्यात २५,००० रुपये उकळल्याची तक्रार दाखल केल्याचे समोर आले.

याचबरोबर “वन व्यापार” केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. सतत खोटे आरोप, बनावट एफआयआर आणि पोलिस तक्रारींच्या माध्यमातून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप हॉटेल मालकांकडून करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्यांची तक्रार; रोहन तोलानी यांना अटक

दरम्यान, काही नागरिकांनी संबंधित व्यावसायिकावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले जाते. तो फरार झाल्यानंतर त्यांनी थेट हॉटेल मालकांवरच गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर राहुल तोलानी यांना नागपूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मूळ व्यवहार आणि तृतीय पक्षातील आर्थिक देवाणघेवाण याचा गुंता अधिकच वाढला आहे.

“सर्व पुरावे आमच्याकडे”; कायदेशीर लढाईसाठी सज्ज

पेमेंट रेकॉर्ड, बँक व्यवहार, करारपत्र, संदेश, सीसीटीव्ही फुटेज व कॉल लॉग असे सर्व ठोस पुरावे आपल्या ताब्यात असून आवश्यकतेनुसार न्यायालयात सादर करू, अशी भूमिका तोलानी कुटुंबाने स्पष्ट केली आहे. खोट्या तक्रारींविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डी व नागपूर व्यापारी क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तथ्य तपासाअंतीच स्पष्ट होणार असले तरी ‘भाडेकरार’च्या नावाखाली सुरू झालेल्या या वादाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – गोवंश हत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेत मोठी कारवाई करत पोलिसांनी हद्दपार केलेल्या इसमाला पुन्हा शहरात आढळून आल्याने अटक केली आहे.

माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फैजान जब्बार कुरेशी (वय २५, रा. कुरेशी मोहल्ला, ममदापूर ता.) यास यापूर्वीच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ (१) अन्वये आदेश क्रमांक हद्दपार/स्थानिक गुन्हे शाखा/मपोकाक ५५/५१७/२०२६, दिनांक ०५/०२/२०२६ नुसार लोणी परिसर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

दरम्यान, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित इसम हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून श्रीरामपूर शहरात मौलाना आझाद चौक परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ श्रीरामपूर शहर गुन्हे शोध पथकाने तपास करून हॉटेल मिरावली, मौलाना आझाद चौक येथे सापळा रचला.

कारवाईदरम्यान फैजान जब्बार कुरेशी उर्फ शेख यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.



बेलापूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावामध्ये स्री पुरुष जन्मदरा मध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. मुलीचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेवून कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत ,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले की बेलापूर खुर्द या गावात मुलींचा

जन्मदर अतिशय कमी असून या मागील उपाय शोधणे आवश्यक आहे गावात व परिसरात कोणी गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे कृत्य कुणी महिला दलाल हे करत असतील तर त्याची माहिती पोलीस खात्याला किंवा महसूल विभागाला द्या आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल उपस्थित पालकांना देखील विनंती आहे की मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नका मुलगी घराची लक्ष्मी आहे. तिच्या जन्माचे स्वागत करा आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक मुले विवाह पासून वंचित आहेत यात महिलांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. हा विषय आरोग्य विभागाचा असला तरी सामाजिक  व कायदेशीर भान आपल्याला ठेवावे लागणार आहे ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी किरण पाटील सावंत म्हणाले की एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते तालुक्याचे जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका. स्री व पुरुष यांना समान वागणूक द्या मनातील नकारात्मक भावना काढून टाका आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे शासनाचे देखील या बाबीकडे लक्ष असणार आहे. कुणी चुकीचं काही करत असेल तर त्याला नक्कीच शासन केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या  की मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका. मुलीला गर्भातच मारू नका. त्याकरता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे ग्रामपंचायत  व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाज जागृती होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.या वेळी द्वारकनाथ बडवे कैलास वाकडे गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबुराव फुंदे ,सौ स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड ,मनीषा थोरात , प्रियंका थोरात कल्पना भगत ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगीळे, आरोग्य विभागाचे डॉक्टर ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने ,संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत, आदीसह अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले शेवटी उपसरपंच एडवोकेट दिपक बारहाते यांनी आभार मानले

सिन्नर (जि. नाशिक) येथील पोलिस ठाण्यात जी.डी. क्रमांक 041 नुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दामोदर रूपते (वय 40 वर्षे) हे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 8 वाजता आपल्या घरीून – उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक येथून कोणास काहीही न सांगता बाहेर पडले असून ते परत घरी आले नाहीत. प्रदीप रूपते यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : उंची : 5 फूट 6 इंच रंग : सावळा चेहरा : उभट केस : काळे, छोटे वेषभूषा : राखाडी रंगाची नाईट पॅंट आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट याबाबत मनोज दामोदर रूपते (वय 45 वर्षे, व्यवसाय – व्यापारी) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (रजी. क्र. 147/2025) करून दिली आहे. सदर व्यक्तीचा शोध सुरू असून, कोणाला प्रदीप रूपते यांची माहिती मिळाल्यास सिन्नर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असा सिन्नर पोलिस ठाण्याचा आवाहन आहे. 📞 संपर्क : 9860158354 तपास अधिकारी : पो. हवालदार हरीश रामेश आव्हाड स्रोत : सिन्नर पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण

अहमदनगर जिल्ह्यातील लोकल क्राईम ब्रँच (LCB) विभागावर गंभीर आरोप होत आहेत. इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम आवद बिनसाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रार अर्जातून या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.तक्रारीत नमूद केलं आहे की, अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि राहुरी परिसरातील काही ठिकाणी LCB पथकाकडून अवैध व्यवसाय, दारू विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थांचा व्यवहार आणि काही भंगार विक्रेत्यांना संरक्षण दिलं जात असल्याच्या चर्चा जोरात आहेत.

पत्रकार संघटनेने या संदर्भात स्पष्ट म्हटलं आहे की

LCB चे काम गुन्हे उघड करणं आहे; पण काही ठिकाणी गुन्हेगारांचं रक्षण करणं दिसतंय. हा विभाग जनतेसाठी भयावह नव्हे, सुरक्षिततेचा आधार व्हायला हवा.”

यासोबतच तक्रारीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अतिरेक आणि दबावाच्या वागणुकीबद्दलही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं नमूद आहे.

पत्रकार संघटनेच्या तक्रारीत आणखी एक मुद्दा ठळक करण्यात आला आहे —

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचं धोरण राबवलं होतं, पण अलीकडे पुन्हा त्याच धंद्यांना खतपाणी मिळत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पत्रकार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पारदर्शक कार्यपद्धती राबविण्याची मागणी केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आटवाडी, एकलहरे येथे मोठी कारवाई करून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुख्य आरोपी अमजद नौशाद सय्यद (वय ३०, रा. आटवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) हा सध्या फरार आहे.


गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. आरोपी अमजद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये विमल ब्रॅण्डचा केसरयुक्त पान मसाला व तंबाखू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला.

तसेच घरामध्येही प्रतिबंधित मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या उपस्थितीत घराचे कुलूप उघडण्यात आले. घराची झडती घेतली असता तेथेही मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला व तंबाखू सापडला. सर्व मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,०६,१८४/- एवढी असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बडे यांना तातडीने कळविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची तजवीज करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेला बंदी आदेश काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. नागरिकांनीही अशा अवैध व्यापाराविषयी माहिती पोलिसांना दिल्यास तातडीने कडक कारवाई केली जाईल.

बेलापूर (प्रतिनिधी)--अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टार नंबर 917/25  कलम 64(1) Bns 

सह 4,8,12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार लॉज मालक,वय 27 वर्ष रा शिगवे नाईक याने  यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम वाढ करून त्यास अटक केली असून. न्यायालयाने  आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.

     यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीने गुन्ह्यास मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीस गुन्हा करण्यास मदत केली म्हणून सदर लॉजच्या मालकास या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे 

    

    बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार आरोपीला  आजन्म करावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या सश्रम  कारावासाची शिक्षा व द्रव्य दंड अशी शिक्षा नमूद करण्यात आली आहे.

     जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने दाखल सर्वच गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान लॉज /हॉटेल चालक, मालक यांचा निष्काळजीपणा व अप्रत्यक्ष /प्रत्यक्ष सहभाग दिसन आल्यास  वरील प्रमाणेच हॉटेल मालक लॉज मालक कॅफे रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हॉटेल लॉज कॅफे मालकांनी याची खबरदारी घ्यावी की आपण रूम देताना अल्पवयीन मुला-मुलींना तर रूम देत नाही ना वयाची पडताळणी करूनच आपला व्यवसाय करावा अन्यथा चुकीचे काम केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे

बेलापूरात काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारे आरोपी पुन्हा बेलापुरात सक्रिय झाल्याचे पाहून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सतर्क पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, जीव मुठीत धरून या संशयितांचा थरारक पाठलाग केला.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुज्ञ नागरिक यांनी नंदकिशोर लोखंडे यांना बाजारात एक संशयित निळ्या रंगाची मारुती ८०० गाडी उभी असल्याची माहिती दिली. तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली. पेठेतून झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने आरोपी फरार झाले.


​या घटनेची माहिती मिळताच, नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून संशयितांचा पाठलाग करण्यास सांगितले. तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून, तर जाधव साहेब आणि कोळपे दादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून संशयितांचा पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले.

​पोलिसांच्या या थरारक पाठलागादरम्यान, भरधाव वेगाने पळणाऱ्या निळ्या रंगाच्या मारुती ८०० गाडीचा लाडगाव रेल्वे चौकीजवळ ताबा सुटला आणि ती पलटी झाली. या अपघातात गाडीतील तीनही संशयित जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पलटी झालेली गाडी बेलापूर आऊटपोस्ट येथे आणण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

​पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बेलापूर( प्रतिनिधी) कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा असफल प्रयत्न झाला चोरट्यांनी  गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.पण तो असफल झाला.               बेलापूर कोल्हार चौकात असलेले एटीएम यापूर्वी देखील फोडण्याचा प्रयत्न झाला होता . त्यावेळी ग्रामस्थांनी  पोलिसांना तातडीने खबर दिली पोलीसही सायरन वाजवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले

सायरन चा आवाज ऐकताच पोलीस आल्याची चाहुल लागली आणखी चोरटे चार चाकी वाहनातून फराक्ष झाले. काल पुन्हा चोरट्यांनी त्याच एटीएमला लक्ष केले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु एटीएम फुटले  नाही. त्यांनी एटीएम च्या  ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कागदी पट्ट्या लावल्या आणि नंतर फोडण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने त्यातील रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.

बेलापूर( प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष व राजकीय नेते इंद्रनाथ  पाटील थोरात यांच्यावर  जो हल्ला झाला त्या संदर्भात दाखल गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण द्वारे, व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून मोठ्या शिताफीने पोलीसांनी किरण रावसाहेब साळवे  वय 34 वर्षे रा. वॉर्ड नं.02 श्रीरामपूर यास ताब्यात घेऊन  अटक केली असुन त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.                 पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी निषेध करून या घटनेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी  केली होती. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात  यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात इसमा विरुध्द भा द वि  कलम 118(1) 119(1)304(2)115(2)352 351 (2) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे,भारत तमनर रविंद्र अभंग, यांनी तातडीने सूत्रे हलवुन श्रीरामपूर येथील किरण रावसाहेब साळवी यास ताब्यात घेतले त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जुनं पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की  बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ  चोऱ्यांचे प्रमाण  वाढले  होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी  परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर  फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून आल्या त्या गाड्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.  त्यात 19  दुचाकी विना नंबर तसेच फॅन्सी नंबरच्या दुचाकी आढळून आल्या एका मोटरसायकलवर तर चक्क नंबर प्लेटच्या जागी नंबर न टाकता सरपंच लिहिलेले होते  या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख याच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव  त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे ,  पोहेकॉ सचिन गायकवाड,पोकॉ संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, रविंद्र अभंग, पंकज सानप ,महेश थोरात आदिंची ही कारवाई केली. पकडलेली गाडी सोडविण्याकरता अनेकांनी आपल्या मित्रांना पुढार्यांना फोन लावले परंतु कारवाई का केली हे सांगताच त्यांनीही फोनवर  तुमच्या पद्धतीने काय असेल ते करा असा सल्ला पोलिसांना दिला.

श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील बाबासाहेब बाळाजी आठरे राहणार फत्याबाद  यांच्या घरी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हीने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पळून गेले परंतु आपल्याला ओळखले असावे असा समज झाल्याने आज सायंकाळी हर्षदा तिच्यावर ऍसिड फेकण्याची घटना घडली असून  या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.                  याबाबत सविस्तर वृत्त असे की फत्याबाद येथील  बाबासाहेब आठरे हे दिनांक रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री जेवण करून झोपले असता पहाटेच्या वेळेस तिन ईसम त्यांच्या घरात घुसले व त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला त्यावेळी त्यांची सुनबाई हर्षदा ही बाथरूमला गेलेली होती त्यादरम्यान चोरट्याने सर्व उचका पाचक केली काही दागिन्याचे गाठोडे बांधले व रोख रक्कम सोबत घेतली नेमकी त्याच वेळेस हर्षदा आठरे ही बाथरूम मधून बाहेर आली व घरात उचकापाचक करत असलेले पाहून जोरात आरडाओरड केली त्यावेळी शेजारीच असलेले आठरे यांचे पुतणे गणेश आठरे सुभाष आठरे चेतन आठरे हे धावत आले हे पाहून चोरट्याने सोन्याचे दागिने असलेले गाठोडे वरून खाली फेकले व दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या व नागरिक येत असल्यामुळे ते आपला जीव वाचून पळाले परंतु त्यांना वाटले की या महिलेने आपल्याला ओळखलेले आहे त्यामुळे दोन दिवसापासून या महिलेच्या मार्गावर ते चोरटे होते कालही त्या महिलेला वीट फेकून मारली होती परंतु ती थोडक्यात बचावली आज बाबासाहेब आठरे यांची सून हर्षदा आठरे ही मुलीला घेऊन फत्याबाद येथे दवाखान्यात आली होती सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी ही देखील होती दवाखान्यातून परत जात असताना दोन इसम मोटरसायकलवर आले व त्यांनी स्कुटीवर चाललेल्या या दोन महिलेच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला त्यात हर्षदा तिची पाठ भाजली व बाबासाहेबांचे पुतणीच्या छातीला भाजलेले आहे त्यांना तातडीने प्रवरणागर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हा हल्ला केवळ आपल्याला ओळखले आहे या गैरसमजुतीतुन झालेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे

बेलापूर प्रतिनिधी-- गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर न घेण्याकरता मंडळ अधिकारी यांचे सहाय्यक यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली याबाबतची तक्रार अहिल्यानगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे       याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलापूर प्रभारी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे सहाय्यक मदतनीस शहाजी वडीतके धंदा खाजगी मदतनीस मंडलाधिकारी यांनी गळलिंब येथील तक्रारदार यांनी खरेदी केलेली खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर न घेण्याकरता अर्ज दाखल केला सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलाधिकारी श्रीरामपूर अतिरिक्त कार्यभार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे सुरू होती या तक्रार अर्जाचा तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालय येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी वडीतके यांनी मंडलाधिकारी मंडलिक यांचे करिता रुपये दहा हजार लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 18 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी वडीतके खाजगी मदतनीस मंडळ अधिकारी बेलापूर याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकारचे निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे करिता रुपये दहा हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी शहाजी वडीतके यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट पोलिस अमलदार सचिन सुद्रुक पोलीस अंमलदार गजानन गायकवाड पोलीस अंमलदार उमेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल हारुण शेख यांनी केली

बेलापुर (प्रतिनिधी  )-भंगारवाल्याकडून खरेदी केलेल्या संशयास्पद तांब्याच्या तारा पुणे येथे घेऊन जाणारी दोन वाहने श्रीरामपूर पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोड करून सोडून दिल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सुनील मुथा यांनी सांगितले की रविवारी रात्री श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान व श्रीरामपूर पासिंगच्या दोन वाहनातून  संशयास्पद तांब्याचा तारा पुणे येथे घेऊन  जात असल्याची खबर श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला मिळाली. त्याने काही कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन सदरची वाहने बेलापूर येथील नगर बायपासला पाठलाग करून पकडली. चालकांची कसून चौकशी केली असता ते दिल्लीचे रहिवासी असून सध्या श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मध्ये राहत असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे सदर मालाची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. ही चौकशी चालू असतानाच श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मधून काहीजण बेलापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यातील तीन जणांनी पोलिसांशी घासाघीस करून काही लाखांची यशस्वी तडजोड केली. त्यानंतर रात्री दीड वाजता कोणतीही नोंद न घेता दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. सदर वाहने पकडून पोलीस स्टेशनला आणल्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाले आहे. अशा तऱ्हेने रक्षकच चोरभामट्यांचे हितचिंतक बनत असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून आर्थिक तडजोड करणारा अधिकारी, त्याचा रायटर, सदर प्रकरणातील  इतर कर्मचारी कोण होतेयाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

श्रीरामपूर नेवासा रोडवर भीषण अपघात अपघातात ट्रक व प्रवासी अँप्पेरिक्षा या समोर समोर धडकल्याने ॲपे रिक्षाचा चक्काचूर एक इसम जागीच ठार वाहतुकीची झाली कोंडी

दिनांक ०६/०४/२०२४ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून नांदूर शिवार ता. राहाता येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर चे निरीक्षक श्री अनुपकुमार देशमाने यांनी दिली.

सदर कारवाई मध्ये एकूण ०१ गुन्हा नोंद करण्यात आला असून ४१८० ली.कच्चे रसायन व ३०० ली . हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहीत्य नष्ट करण्यात आले आहे. सदर मुद्देमालाची एकूण किंमत रु.२,०४,८००/- इतकी आहे सदर कारवाईत एकूण ०१ आरोपी वर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद कारण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री. प्रवीण कुमार तेली उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर, श्री जी. एन. नायकोडी दुय्यम निरीक्षक, श्री एस. एस. पवार दुय्यम निरीक्षक, श्री के. के. शेख सहा. दुय्यम निरीक्षक, श्री एस.डी.साठे सहा. दुय्यम निरीक्षक, श्री. तौसीफ शेख जवान, व महिला जवान श्रीमती एस. आर. फटांगरे, श्री एन.एम. शेख जवान नि वाहन चालक यांनी सहभाग घेतला आहे. अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री अनुपकुमार देशमाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र २ श्रीरामपूर यांनी दिली.

asten

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget