माजी सभापती थोरात यांच्यावर झालेल्या आल्या संदर्भात एकास अटक दोन दिवसाची पोलीस कोठडी
बेलापूर( प्रतिनिधी )-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील खरेदी विक्री देखरेख संघाचे अध्यक्ष व राजकीय नेते इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर जो हल्ला झाला त्या संदर्भात दाखल गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण द्वारे, व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून मोठ्या शिताफीने पोलीसांनी किरण रावसाहेब साळवे वय 34 वर्षे रा. वॉर्ड नं.02 श्रीरामपूर यास ताब्यात घेऊन अटक केली असुन त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी निषेध करून या घटनेत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानंतर माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात इसमा विरुध्द भा द वि कलम 118(1) 119(1)304(2)115(2)352 351 (2) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे,भारत तमनर रविंद्र अभंग, यांनी तातडीने सूत्रे हलवुन श्रीरामपूर येथील किरण रावसाहेब साळवी यास ताब्यात घेतले त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जुनं पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
Post a Comment