उक्कलगाव ग्रामस्थ व पोलीसांच्या मदतीने मनोरुग्ण सुखरूप पोहोचला घरी
बेबेलापूर (प्रतिनिधी)- कसलीही माहिती उपलब्ध नसताना मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेवुन बेलापूर पोलीसांनी त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले मनोरुग्ण मुलाला पहाताच आई व भावाला गहीवरुन आले . पोलीसातील माणूस आजही जिवंत असल्याची भावना आई अलका ससाणे यांनी व्यक्त केली. वाहेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील सोमनाथ नंदकुमार ससाणे हा मनोरुग्ण आहे .त्या अवस्थेत त्याने घर सोडले व भटकत भटकत तो उक्कलगाव येथे पोहोचला. येथील शिंदे वस्तीत गेल्यावर त्याने आरडाओरड सुरु केली अशोक शिंदे ,शुभम शिंदे,वैभव शिंदे, प्रमोद शिंदे यांनी तातडीने युवा नेतृत्व युवराज थोरात यांना माहिती दिली. युवराज थोरात पोलीस पाटील हिराबाई मोरे , इंद्रजित मुसमाडे ,मुकेश जगधने, दिपक पवार ,सोन्या खेमनर यांच्या सह शिंदे वस्तीवर पोहोचले त्यांना वाटले चोर असावा परंतु तो निरर्थक बडबड करीत होता. तो काहीही बोलू लागला. कुणाच्याही घरात जावु लागला रस्त्यावर बसुन लोळू लागला .युवराज थोरात व पोलीस पाटील हिराबाई मोरे यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांना या बाबत माहिती दिली संपत बडे तातडीने तेथे आले त्यावेळेस योगेश ससाने याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. त्याला माहिती विचारली असता तो केवळ ससाने इतकेच सांगत होता त्यामुळे काय करावे हा प्रश्न बडे यांना पडला त्यांनी त्याला खोदून खोदून विचारले परंतु त्याला काही नाव गाव पत्ता काहीच सांगता येत नव्हते व तो वेगळीच काहीतरी बडबड करीत होता. बडे यांनी गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजीत थोरात, व हर्षल इंगळे यांच्या सहकार्याने त्यास बेलापूर पोलीस स्टेशन येथे आणले. तेथे त्याला नाश्ता दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक वार तपासणी केली असता त्याच्या खिशात एक बारीक कागद सापडला त्यावर कुणाचा तरी नंबर होता पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्या नंबर वर संपर्क साधला असता त्यांनी देखील मी संबंधितास ओळखत नाही माझ्या परिचयाचा नाही असे सांगितले परंतु बडे यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने त्या गावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. बडे यांनी संबंधित व्यक्तीच्या फोनवर फोन केला असता त्याने सदर इसम आमच्या गावातीलच असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले व त्याच्या भावाचा व आईचा नंबर दिला पोलिसांनी तातडीने त्याचा भाऊ योगेश याचेशी संपर्क साधला भाऊ मिळाल्याचे समजताच दोघांनाही अतिशय आनंद झाला ते तातडीने बेलापूर येथे येण्यास रवांना झाले तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती देखील आईने पोलिसांना केली पहाटे दोन वाजता त्याची आई अलका नंदकुमार ससाने व भाऊ योगेश बेलापूर पोलीस स्टेशनला आले व भावाला ताब्यात घेतले त्यावेळी आईचा व भावाचा आनंद गगनात मावेना त्यांनी मुलाला शोधून दिल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद दिले. पोलीस आपले कर्तव्य चूक बजावत असून आपल्या मनोरुग्ण मुलाला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात दिल्याबद्दल आई अलका नंदकुमार ससाने हिने बेलापूर पोलिसांना धन्यवाद दिले ससाने कुटुंबीयाचे आनंदाश्रू पाहून पोलीस कॉन्स्टेबल बडे व होमगार्ड रणजीत थोरात महेश थोरात हर्षल इंगळे यांनाही गहिवरून आले


Post a Comment