पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ७ परिसरातील रहिवासी व मोबाईल दुकान व्यावसायिक राकेश काटारिया (वय ३२) यांच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून विविध मोबाईल अॅक्सेसरीज चोरी केल्या होत्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१ (३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना तपास पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १) बलदेव सिंग मंचर सिंग टाक (वय २०) व २) विशाल भरत बोरुडे (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मोबाईल अॅक्सेसरीज जप्त केल्या.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपनीचे मोबाईल चार्जर, इअरबड्स, हेडफोन, डेटा केबल, कार चार्जर, स्पीकर व इतर साहित्याचा समावेश असून एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेका / जयवंत तोडमल, पोहेकों/भागवत शिंदे, पोकों/संपत बडे, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/संभाजी खरात, पोकों/सागर बनसोडे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/सचिन दुकळे, पोकॉ रामेश्वर तारडे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/पांडुरंग चौधरी, पोकों/गणेश तुपे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/जयवंत तोडमल हे करीत आहेत.


Post a Comment