शिर्डी( जय शर्मा )-कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून अनेक दिवस आपल्या घरात ,शेतात राहणारे मेंढपाळ आपल्या मेंढ्या, शेळ्या घेऊन आता नाविलाजाने गावोगाव भटकंती करत चाऱ्याच्या शोधार्थ फिरत असल्याचे दिसत आहे,तशी सुरुवात झाल्याचे दिसू लागले आहे,
गेल्या 52 दिवसापासून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडॉऊन सुरू आहे, सर्व बंद आहे, त्यामुळे सर्व जण घरात आहे, शेळ्या, मेंढ्या,घरी,शेतात होत्या,पाळीव जनावरेही आपल्या दारात प्रत्येकाने बांधून ठेवले आहेत, मात्र आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे ,त्यामुळे आता तापमानही वाढले आहे, अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई हळूहळु भासायला सुरुवात झाली आहे, शेळ्या ,मेंढ्या, जनावरांना चारा, पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल होत आहे, ५१,५२, दिवस आपापल्या गावात ,घरात शेतात राहणारे मेंढपाळ आता नाविलाजाने दरवर्षाप्रमाणे मेंढ्यांच्या कळप घेऊन आपल्या गावा बाहेर पडले आहेत, दुसरे गावात जाऊन ,चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करत आहेत, मेंढ्यांना शेळ्यांना चारा ,पाणी यांची आवश्यकता असल्याने नाविलाजाने आम्ही आमच्या घरून बाहेर पडलो आहे ,मात्र आम्ही गावाएेवजी ,शेतामध्ये रानामध्ये,वनामध्ये एकांत मुक्काम करतो ,लॉक डाऊंनच्या नेमात राहतो ,मास्क वापरतो, गावात किंवा रस्त्याने जाण्याऐवजी आड बाजूने मेंढ्यांचे कळप घेऊन, चाऱ्याच्या शोधार्थ आम्ही जात असतो, लॉक डाऊन मुळे अनेक गावात बाहेरील व्यक्तीला परवानगी नाही त्यामुळे आम्हीही आडबाजूच्या रस्त्याने, माळरानात ,शेतात वस्ती करून तेथेच राहतो, लहान मुले व वयस्कर, वृद्ध माणसे यावर्षी आम्ही घरीच ठेवली आहेत, आम्हालाही कोरोनाची भीती आहे, आमच्या मेंढ्या ,शेळ्या यांनाही ही कोरोणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण घरी आमच्या शेतात मेंढ्या ,शेळ्यांना मुबलक चारा व पिण्यास पाणी नसल्यामुळे नाविलाजाने आम्हाला घराबाहेर, गावा बाहेर पडावे लागत आहे, घरी राहून या मेंढ्यांना चारा पाणी कुठून देणार। तसेच बाजारात विक्री करण्यासाठी ही बाजार बंदआहे, मग आम्ही काय करणार। असे सांगत आम्ही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवस गावात, घरातच कसेबसे काढले, मात्र आता शेळ्या-मेंढ्यांच्या पोटापाण्याचा विचार करून आम्ही एक एक किंवा दोघे घरातील माणसे बाहेर पडलो आहे, मेंढ्यांच्या चारा, पाण्यासाठी ते करणे भाग पडत आहे, लॉक डाऊन च्या या तिसऱ्या टप्प्यात रानोमाळ फिरणार्या भटकंती करणार्या, पोटापाण्यासाठी चारा पाण्यासाठी फिरणाऱ्या मेंढपाळ साठी शासनाने लॉक डाऊनच्या नियमात थोडीशी आमच्यासाठी तरी शिथीलता करावी ,कारण आम्ही घरी किंवा आमच्या शेतात चारा पाण्याअभावी राहू शकत नाही ,त्यामुळे आम्हाला गावोगाव भटकंती करणे गरजेचे आहे, परंतु असे करताना आम्ही गावाच्या बाहेर रानात, वनात मुक्काम करत असतो, कोणालाही गर्दी किंवा त्रास होऊ नये म्हणून याची काळजी घेत आहे ,या गोष्टीचाही शासनाने विचार करावा,, असे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मेंढपाळ बोलताहेत ,अाता।अनेक मेंढपाळ ड्राय भागातून बागायत भागात आल्याचे दिसून येत आहे.
