श्रीरामपुर /प्रतिनिधी :लोकडाऊन मध्ये आख्खा देश त्रस्त असताना गोदी मिडियाचे काही दलाल पत्रकार व ॲकर आपल्या चॅनलचे टी.आर.पी वाढवण्यासाठी एखाद्या धर्माची बदनामी व्हावी म्हणून काहीही बडबड करतात यासाठी आपले चॅनल न्युज 18 इंडियाचे टी.आर.पी वाढवण्यासाठी व मुस्लिम द्वेश पसरवण्यासाठी अमिश देवगण नामक दलाल पत्रकाराने मुस्लिमांसाठी द्वैववत असणारे ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती यांच्या बद्दल अपशब्द वापरुन आम्हा मुस्लिम बांधकांच्या भावना दुखावल्या आहे.अमिश देवगण हा ॲकर वेळोवेळी आपल्या शो मध्ये कोणालाही बोलवून फालतु डिबेट करत असतो .यात कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील याच सुद्धा भान ठेवत नाही .त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण करणारा अमिश देवगणवर गुंन्हा दाखल करावे नी न्युज 18 चॅनेलवर बंदी घालावी असे निवेदन प्रांताधिकारी अनिल पवार यांना समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आले .निवेदनावर समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएब जमादार , तालुकाध्यक्ष फय्याज कुरेशी , शहराध्यक्ष इमरान इरानी ,अरबाज कुरेशी ,दानिश पठाण ,आसिफ तांबुळी , जकरिया सय्यद , जाहिद कुरेशी , तनवीर शेख यांच्या सह्या आहेत .
Post a Comment