Articles by "news."

श्रीरामपूर: दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा आणि ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन दै. जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी केले. श्रीरामपूर येथे माजी मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून दिव्यांगांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संजय साळवे यांच्या कार्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांगांच्या ९९% समस्या मार्गी लागल्या आहेत, असे आगे यांनी नमूद केले. दिव्यांगांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले, तसेच श्रीरामपूर तालुका दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात एक पथदर्शी प्रकल्प ठरत असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात श्रीरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असलेले निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावला. संजय साळवे अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवत असून, ते दिव्यांगांसाठी देवसमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी सांगितले की, मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना राबवली जाईल.

निलेश शिंदे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, खजिनदार सौ. साधना चुडीवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, राज्य समन्वयक विनोद कांबळे सर, भारत मुक्ती मोर्चाचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताकभाई तांबोळी यांनी केले, तर वर्षा गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतुभाऊ मावरे, दिनेश पवार, सतीश साळवे, फिरोज शेख, सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले.


श्रीरामपूर तालुक्यातील भामानगर येथील श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान येथे महाशिवरात्रीचा पवित्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. भगवान शिवाच्या उपासनेसाठी महत्त्वाचा असलेल्या या दिवशी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान शिव हे संहारकर्ता आणि पुनरुत्थान करणारे देव असून, ते भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण करतात. ते त्रिमूर्तींपैकी एक असून सृष्टीचा समतोल राखतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, असे मानले जाते. तसेच, या दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते, असे अनेक धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे. शिवभक्त या दिवशी उपवास करतात, जागरण करतात, मंत्रजप व अभिषेक करून भगवान शिवाची आराधना करतात.

    भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून प्रगट झालेल्या अग्निनारायणाचाच अवतार म्हणजे अडबंगनाथ महाराज आहे. असा हा पवित्र अडबंगनाथ जन्मोत्सव व महाशिवरात्री उत्सवाची प्रथा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांनी घालून दिलेली आहे. त्यामुळे या दिवसाला गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने विशेष महत्व आहे.

   अश्या या विशेष दिवशी अत्यंत उत्साहाने विविध धार्मिक  कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांची सुरुवात बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता नाथांचा अभिषेक व होम हवन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता ज्या भावीकांचे धर्मनाथ बीज उत्सवासाठी अनमोल योगदान लाभलेले आहे अशा भाविकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे सत्संग प्रवचन होईल. तसेच दु.12 वाजता ओम चैतन्य अडबंगनाथ जन्मोत्सव साजरा होईल.

  तद्नंतर खिचडी महाप्रसाद श्री.अर्जुन आप्पा लोखंडे पाथरे  यांच्या वतीने होईल व संतपूजन श्री.बाळासाहेब वाकचौरे नाशिक यांच्या वतीने होईल. 

या दिवशी हजारो भाविकांना अडबंगनाथांचे दर्शन घेण्याचा अभूत पूर्व योग प्राप्त होणार आहे.भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात हा सोहळा भाविकांसाठी अपूर्व आनंद देणारा ठरणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री अडबंगनाथ मंदिरात आध्यात्मिक लहरींनी भारलेले वातावरण अनुभवता येणार आहे. भव्य दिव्य असा महाशिवरात्री व अडबंगनाथ जन्मोत्सव आयोजित केलेला आहे तरी या ठिकाणी दिवसभर हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अन्नक्षेत्र, गुरुकुल चालू आहे तरी आपणास कार्यक्रमासाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन श्री क्षेत्र अडबगनाथ देवस्थानचे महंत अरुणगीरीजी महाराज यांनी केले आहे 


तसेच हजारो शिवभक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी )--श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी असलेले श्रीकिसन मुंदडा यांचे सुपुत्र डॉक्टर अतिश मुंदडा यांना असोसिएशन ऑफ फॉर्म्युसुटिकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एकदिवसीय परिषदेत डॉक्टर एस जी वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   छत्रपती संभाजीनगर येथे १५फेब्रुवारी रोजी झालेल्या असोसिएशन ऑफ फार्मासुट्टीकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एक दिवशीय परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात चांदवड येथील एस एन जे बी संचलित श्रीमान सुरेश दादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉक्टर अतिशकुमार श्रीकिसन मुंदडा यांना *डॉ. एस. जी. वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर* या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी असोसिएशन ऑफ फार्मासुटीकल टीचर्स ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. सोहन चितलांगे तसेच महाराष्ट्र शाखेचे प्रेसिडेंट डॉ. राकेश सोमानी व व्हाईस प्रेसिडेंट डॉ. स्वरूप लाहोटी आणि डॉ. शिरिष जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आठवडाभरापूर्वीच डॉ . मुंदडा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात दोन मानाच्या पुरस्कारावर डॉ. मुंदडा यांनी मोहर लावल्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 तायक्वांदो संचालक स्पर्धा डीओसी प्रवीण कुमार यांची हकालपट्टी!!!

गौरव डेंगळे/४/२/२०२५:डे हराडून: उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोमध्ये पदकांची विक्री आणि फिक्सिंगचा कथित प्रकार समोर आला आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या गेम टेक्निकल कंडक्ट कमिटी (GTCC) ने या प्रकरणात कारवाई केली आहे . या प्रकरणातील आरोपी तायक्वांदो डायरेक्टर कॉम्पिटिशन डीओसीला खेळ सुरू होण्याच्या अगदी आधी काढून टाकण्यात आले आहे.

खरंतर, उत्तराखंडमध्ये होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये तायक्वांदो स्पर्धा हल्द्वानी येथे होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मॅच फिक्सिंग आणि पदकांच्या खरेदी-विक्रीचे आरोप समोर आले होते. त्यामुळे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या गेम टेक्निकल कंडक्ट कमिटीने तायक्वांदो डायरेक्टर कॉम्पिटिशन डीओसी प्रवीण कुमार यांना काढून टाकले आहे . त्यांच्या जागी दिनेश कुमार यांना स्पर्धा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जीटीसीसीच्या अध्यक्षा सुनैना कुमारी यांनी पीएमसीसीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. सुनैनाने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे-

राष्ट्रीय खेळ तायक्वांडो पदक प्रकरण

आयओएने जारी केलेले पत्र!!!

पीएमसी समितीच्या शिफारशी विचारात घेणे आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खेळांचे पावित्र्य राखणे महत्वाचे आहे. स्पर्धेच्या माजी संचालकांविरुद्ध तक्रारी प्राप्त होण्याव्यतिरिक्त, त्यांनी आयोजित केलेल्या क्रीडा विशेष स्वयंसेवकांच्या निवड चाचण्या. काही राज्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकारी समिती सदस्य तसेच उपकरणे विक्रेत्यांनाही यासाठी नामांकित करण्यात आले होते.


भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (IOA) चे अध्यक्ष पीटी उषा यांनी जीटीसीसीच्या निर्णयाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या-

सर्व भागधारकांनी क्रीडा भावना राखणे आणि देशातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर सर्व सहभागींना त्यांची प्रतिभा दाखवण्याची योग्य संधी देणे महत्वाचे आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रीय खेळांसाठी पदक पुरस्कार खेळाच्या मैदानाबाहेर ठरवण्यात आले हे धक्कादायक आणि दुःखद आहे.

"आम्ही आयओएमध्ये आमच्या खेळाडूंशी निष्पक्ष राहण्यास तसेच स्पर्धेत फेरफार करण्याचा आणि राष्ट्रीय खेळांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहोत," असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे .

निवेदनानुसार, पीएमसी समितीला असे आढळून आले की भारतीय तायक्वांदो फेडरेशनने नियुक्त केलेले काही अधिकारी " स्पर्धा सुरू होण्याच्या खूप आधी १६ पैकी १० वजन गटातील सामन्यांचे निकाल निश्चित करत होते ." आयओएकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णपदकासाठी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. रौप्य पदकासाठी दोन लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी एक लाख रुपये मागितले गेले. ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान हल्द्वानी येथे तायक्वांदोच्या एकूण १६ क्योरुगी आणि १० पूमसे स्पर्धा होणार आहेत. आरोपांनुसार, भारतीय महासंघाने १६ पैकी १० वजन गटातील सामन्यांचे निकाल आधीच ठरवले होते.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने वार्तालाप,हळदी कुंकू व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा महिलांनी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सदस्यांनी तसेच बाळ गोपाळानी मन मुराद आनंद लुटला.  सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने नुकताच अनमोल रसवंती गृह याठिकाणी सहकुटुंब हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या उपक्रमाचा उद्देश सांगताना सत्यमेव जयते ग्रुपचे देविदास देसाई व अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की महिलांना दररोजच्या कामातून थोडीशी मोकळीक मिळावी किचन, टीव्ही आणि मोबाईल या विळख्यातून महिलांना बाहेर काढण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली इरफान जागीरदार यांनी दाताने नारळ सोलून दाखविला अनेकांनी सुंदर असे उखाणे घेऊन या कार्यक्रमाचे रंगत वाढवली काहींनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच चुटकुले विनोद सांगितले कार्यक्रमाची सुरुवात किरण गागरे यांच्या अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान या भजनाने झाली अनेक महिलांनीही या मनमुराद गप्पागोष्टी मध्ये सहभाग नोंदविला व आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली यावेळी सौ प्रतिभा देसाई रत्नमाला डावरे मानवी खंडागळे राजश्री गुंजन आरती अंबिलवादे नयना बोरा जयश्री अमोलिक कावेरी गागरे मयुरी आंबेकर योगिता काळे तुझ्या दाणी सोनाली देवरे सुवर्णा सोनवणे संगीता घोंडगे संजीवनी सूर्यवंशी यांच्यासह अभिषेक खंडागळे देविदास देसाई, विष्णुपंत डावरे,संजय भोंडगे, दिपक क्षत्रिय, संपत बोरा, किरण गागरे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, बाबासाहेब काळे, बाबुलाल पठाण, इरफान शेख,संदिप सोनवणे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,गोपी दाणी,सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते

इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती राहिली नाहीपोलिस उपनिरीक्षक चौधरी

बेलापूर (प्रतिनिधी) वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, वाचाल तर टिकाल आणि वाचनासाठी गरज आहे ती पुस्तकाची. वाचनाने वक्ता, श्रोता, नेता तयार होतो त्याचबरोबर उत्तम श्रवण कौशल्य जीवनात योग्य मार्ग दाखवित असल्याचे मत सात्रळ  कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.                   


श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे सिद्धेश्वर ग्रामीण ग्रंथालय व वाचनालय आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या सांगता समारोहप्रसंगी तसेच संस्थेने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आदिनाथ वडीतके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, वनपाल अक्षय बडे ह. भ. प. बापूसाहेब चिंधे,प्रशांत विटनोर,सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात प्राध्यापक शिंदे म्हणाले की आज समाजात समाजासाठी धडपड करणाऱ्या माणसाची उणीव भासत आहे प्रत्येक जण स्वतःच हित पाहून कार्य करत आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले नसते आज समाजासाठी धडपडणारे माणसं खूप कमी आहे पुस्तक हे माणसाचं मन निर्मळ करणारी साबण आहे. असेही  प्राध्यापक शिंदे म्हणाले.

 

     यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी म्हणाले की इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे. तरुणांमध्ये संयम राहिलेला नाही रागाच्या भरात तरुणांकडून अनेक अपराध घडत आहेत. शासनाने राबविलेले वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. असेही पोलीस उपनिरीक्षक चौधरी म्हणाले.

सचिव सुनील शिंदे यांनी प्रस्तविक केले वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्याच्या सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथालय परिसराची सामूहिक स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन आदी उपक्रम राबविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत राबविला आहे. आज आपल्या ग्रंथालयामध्ये १३४६५ ग्रंथ उपलब्ध असून नियमित वचकांसाठी १३ वृत्तपत्र व मासिकही उपलब्ध आहे.असे  सचिव शिंदे यांनी सांगितले.

     यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, विद्यार्थिनी प्रिया वडीतके यांची भाषणे झाली.

      यावेळी वनपाल अक्षय बडे, 

ह.भ.प. बापूसाहेब चिंधे सर, सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे,मुख्याध्यापक म्हसे सर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चित्ते मॅडम, संस्थेचे संचालक चंद्रकांत वडीतके,शिंदे सर , तुपे सर, दळवी सर,, काटकर सर, रवींद्र काळे सर, दळवी सर, सौ.शिंदे,सौ.बेलकर,पंढरीनाथ भोसले, संजय विश्वासे, वृक्षसंवर्धक अजित देठे, ग्रंथपाल सुभाष भोसले, शिवाजी कोऱ्हाळे, संदीप शेरमाळे, रमेश भोसले, इंद्रभान तुपे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्ताविक संस्थेचे सचिव सुनील शिंदे यांनी तर आभार सौ वाघ मॅडम यांनी मांडले.

श्रीरामपूर  -नेवासा-संगमनेर रोड ची झालेली प्रचंड दुरावस्था व शहरातील इतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने नगरपलिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांनी केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला सुनावले की, "नेवासा-संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारून नागरिकांसाठी न्याय मिळवेल


यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली."रस्ते दुरुस्त करा" आणि "प्रशासन हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांच्या हालांची दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल,असा इशारा यावेळी दिला गेला.26 जानेवारी पर्यंत श्रीरामपूर आतील रस्त्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.


या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन,रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले.


यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता,गौतम उपाध्ये, बाळासाहेब खाबिया, योगेश ओझा,संदीप आगरकर,नंदूशेठ कोठारी,संजय कासलीवाल,राहुल कोठारी,प्रेमचंदजी कुंकुलोळ,मुकेश कोठारी,माजी नगरसेवक राजू अदिक, पत्रकार सलीमखान पठाण माजी नगरसेवक भरत कुंकूलोळ,शरद कोठारी, नगरसेवक आण्णासाहेब डावखर, नगरसेवक आशिष धनवटे,भरत जगदाळे,अशोक बागुल,संजय रूपटक्के, अशोक शिवरकर, नवनाथ जेजुरकर, संजय लाड,चंद्रकांत कर्नावट,सुभाष जंगले, नवनाथ शेळके निवृत्त अभियंता नामदे साहेब, कैलास शिंदे,राजेंद्र भोंगळे,राजेंद्र भांबरे, सुरेश कांगुणे,संजय आगाशे,बापूसाहेब तुपे, जगन्नाथ हरार,विजय गांधी,चिरायु नगरकर, नजीरभाई शेख,बुऱ्हान जमादार,मुन्ना पठाण, माजी नगरसेवक सुनील बोलके,सुनील गलांडे,निलेश गोराणे, अमरप्रीत सेठी,माजी नगरसेवक श्याम अडांगळे,निलेश धुस्सा,सुरेश कोळेकर, किरण कर्नावट,दीपक कदम,हरीकृष्ण निर्माळ,नितीन हारदे,धीरज तलवार,संतोष मोरगे,अजय भागवत,मयूर पाटनी,विनीत कुंकूलोळ, निलेश बोरावके,विलास बोरवके,शिवसेनेचे ज्येष्ठ अशोक मामा थोरे, तालुकाप्रमुख लखन भगत,सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्ये,शरद गवारे तेजस बोरावके, युवासेना तालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहर प्रमुख सिद्धांतभैय्या छल्लारे, रोहित नाईक,विशाल पापडीवाल,विक्रम नाईक,अकिल पठाण, प्रमोद गायकवाड,बापू तुपे,रोहित भोसले,अजय छल्लारे,प्रकाश परदेशी, योगेश ढसाळ,शुभम छल्लारे,राजू डुकरे, मुस्ताक शेख,विशाल दुपाती,महेश जगताप, गोरख गुळवे,निलेश मटाले,मोती व्यवहारे, देवेन पीडियार,ज्ञानेश्वर सारंधर,विकी गंगवाल, लोकेश नागर,सुहस परदेशी,बापू बुधेकर,  दत्ता करडे,प्रवीण शिंदे,व इत्यादी सह शिवसैनिक उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी)--श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे येथील सरपंच पदी सौ कल्पना अण्णासाहेब गेठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळत्या सरपंच सौ सविता शहाजी वडीतके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेले याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद तांबे निखिल वडीतके सौ सुमनबाई जांभुळकर सौ पुष्पाताई चितळकर सविता वडीतके गोकुळ पवार आदी सदस्य उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी मंडलिक यांनी काम पाहिले तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डमाळे यांनी काम पाहिले ग्रामसेवक ताराचंद गाडे यांनी त्यांना सहाय्य केले नूतन सरपंच कल्पना गेठे यांना माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या नूतन सरपंच निवडीनंतर सौ कल्पनाताई गेठे व मावळत्या सरपंच सविता शहाजी वडीतके यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी अण्णासाहेब गेठे मंडळाचे नेते प्राध्यापक भानदास वडीतके तंटामुक्ती अध्यक्ष शंकर पावले चांगदेव वडीतके भाऊसाहेब चितळकर विठ्ठल चितळकर बबनराव वडीतके केशवराव दळवी सुमित तांबे प्रभाकर तांबे बापूसाहेब शेंडे प्राध्यापक बबनराव तांबे जालिंदर तांबे मच्छिंद्र तांबे विठ्ठल दळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो  या उद्देशाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ह भ प शितलताई साबळे यांनी व्यक्त केले नागेबाबा परिवाराकडून गळनिंब येथील भोसले परिवाराला नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत दहा लाख रुपये मदत निधी देण्यात आला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून साबळे ताई बोलत होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार देविदास देसाई गळनिंब येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे कॉम्रेड पांडुरंग शिंदे जानकु वडीतके आरोग्य मित्र सुभाष गायकवाड अण्णासाहेब कडनोर डॉक्टर सुनील शिंदे बबनराव वडीतके अण्णासाहेब जाटे उपस्थित होते. कोल्हार शाखेचे खातेदार व गळनिब येथील रहिवासी कै. प्रदीप इंद्रभान भोसले यांचे चार महिन्यापूर्वी आकस्मीत निधन झाले  प्रदीप भोसले यांनी नागेबाबा पतसंस्थेच्या कोल्हार शाखेकडून 1500/- भरून नागेबाबा सुरक्षा कवच या योजनेअंतर्गत नाव नोंदणी केली होती. सदर योजनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे यांना असल्याने त्यांनी संस्थेला माहिती दिली. अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यु झालेल्या प्रदीपच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. श्री संत नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजने अंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश ह भ प शितलताई साबळे व ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या शुभहस्ते भोसले कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी आरोग्यमित्र सुभाष गायकवाड  देविदास देसाई नागेबाबा परिवारातील योगिता पटारे राजू चिधे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नागेबाबा परिवाराचे सदस्य राजू भाऊ चिंधे,यशवंत मिसाळ रिजनल ऑफिसर, योगिता पटारे मॅडम, प्रशांत रासकर, नंदा बाचकर, महेश मोहिते, शुभम साबळे ,विशाल अनाप, कैलास चोखर, अमित बोरावके, योगेश भाग्यवान, आसिफ सर,अण्णासाहेब कडनोर, सरपंच शिवाजी चिंधे,मच्छिंद्र थोरात, डॉक्टर कोंडीराम चिंधे, डॉक्टर सुनील चिंधे, संजय कुदनर, बबनराव वडीतके, रामदास एनोर, अण्णासाहेब जाटे, नामदेव जाटे,संजय शिंदे, अजित देठे, संजय भोसले, चंद्रभान भोसले, इंद्रभान भोसले प्रभाकर भोसले सचिन भोसले, ग्रंथपाल सुभाष भोसले, यादी भोसले कुटुंबिय उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन सूर्यभान वडीतके यांनी तर आभार सुनील शिंदे यांनी मांडले.

कोपरगाव ( गौरव डेंगळे): आई-वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य देखील शिक्षक करत असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन  सर्जेराव मते यांनी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानादरम्यान बोलताना केले.

श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवता असते. आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामाच्या अभंगवाणीतून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे सांगितले तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा व नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते मते यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य के एल वाकचौरे यांनी स्वागत केले. 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा ढवळे हिने केले. 

मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही ठेवली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नॉर्दन ब्रांच पासून वॉर्ड नंबर दोन मधून गेलेल्या प्रवरा कालव्याला काल दुपारपासून मोठे भगदाड पडले.त्यामुळे वैदूवाडा पुलापासून थोड्या अंतरावर या भागातून पाणी शेजारच्या रस्त्यावर तसेच आसपासच्या घरांमध्ये शिरले.जवळच नगरपालिकेची मोठी गटार असल्याने बरेचसे पाणी त्या गटारीत वाहून गेले. दुसऱ्या बाजूला फातेमा कॉलनीच्या बाजूने सुद्धा दुपारपासून पाणी फातमा कॉलनीतील प्रमुख रस्त्यांवर वाहत आहे.काल दुपारी उर्दू शाळेची मुले या पाण्यामध्ये खेळताना काही नागरिकांनी त्यांना हाकलले अन्यथा यातून एखादी मोठी दुर्घटना घडली असती. दुपारपासून आता रात्री अकरा वाजेपर्यंत प्रचंड पाणी वाया गेले असून परिसरातील

नागरिकांना सुद्धा याचा मोठा त्रास झाला आहे.परंतु पाटबंधारे खाते किंवा नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदरचा कालवा अनेक ठिकाणी उखडला आहे. वैदू वाड्यात पुलाजवळ तर या कालव्याचे पात्र एखाद्या नदीसारखे झाले आहे. शेजारीच रस्ता असल्यामुळे अनेक दुचाकी स्वार त्यात पडले आहेत. तसेच येथून नागरिक व विद्यार्थ्यांची नेहमी ये जा चालू असते. याबाबत पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या तरी सुद्धा अद्याप दखल घेतली गेली नाही. काल कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होऊन कालव्याच्या बाहेर पडले.त्यातच दोन ठिकाणी भगदाड पडल्याने सदर पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले. पाटाला पाणी आल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या बाबीकडे पाटबंधारे खात्याच्या या अक्षम्य दुर्लक्ष बद्दल जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात पाटबंधारे खात्याच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्रीरामपूर - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंती निमित्त डी डी काचोळे माध्य. विद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेली कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक अभूतपूर्व व इतिहासिक ठरली. मिरवणुकीचे नियोजन व संयोजन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सील सदस्या मीनाताई जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.  मिरवणूकीचे उदघाटन जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. जवळपास चार किमी लांबीच्या मिरवणुकीने शहरात विक्रम केला आहे. 

       मिरवणुकीमध्ये जवळपास ३००० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, घोडे, उंट , बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, शिवराज्यभिषेक सोहळा , विज्ञान व तंत्रज्ञानाची गगन भरारी चंद्रयान, आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौकात चौकात संबंधित नृत्य व विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले. 

   राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी पंजाबी साउथ आदिवासी दक्षिणात्य संस्कृती वारकरी आदी नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला. सजावलेल्या ट्रॉलिमध्ये सर्वधर्मीय वेशभूषा, विविध समाज सुधारक व साधू संतांची वेशभूषा यातून समानतेचा व सर्व धर्म समभाव याचा संदेश देण्यात आला. 

शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्या


चं औक्षण केलं. श्रीरामपूर आतील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रांताधिकारी किरण सावंत, डी. वाय. एस. पी. डॉ. बसवराज शिवपूजे, तहसीलदार मिलिंद वाघ, कामगार हॉस्पिटल वैद्य अधिकारी डॉ. रवींद्र जगधने , प्राचार्य पी व्ही बडधे, प्राचार्य डॉ. एस.ए. निंबाळकर,  प्राचार्य डॉ.एम.एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे, सौ. जयश्री जगताप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, गणेश थोरात, सुनिल डहाळे, मेजर कृष्ण सरदार, बाळासाहेब भागडे, मा.नगरसेवक  आशिष धनवटे आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण लक्षनीय ठरले.

मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव,  संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञानाची भरारी चंद्रयान, स्वच्छता व आरोग्य आदिविषयांचा संदेश देणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ.विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र  महाविद्यालय व डी डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकीचा समारोप कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ समारोप झाला. यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.

       कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी डी काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्राफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.

     कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

बेलापुर - (प्रतिनिधी  )-तालुक्यातील बेलापूर येथील वीज उपकेंद्रात असणाऱ्या रोहित्राची क्षमता कमी पडत असल्याने ओव्हरलोड होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे ग्राहक वैतागून गेले आहेत.मात्र आता एका रोहित्राची पाच एमव्हीए एवढी क्षमता वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती उद्योजक जितेंद्र तोरणे यांनी दिली आहे.

      या बाबता माहीती देताना उद्योजक तोरणेयांनी सांगितले की बेलापूर येथे ३३ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र असून येथे ५ एमव्हीए क्षमतेचे तीन व ३.१५ एमव्हीए क्षमतेचे एक असे एकूण १८.१५ एमव्हीए क्षमतेचे एकूण चार रोहित्र आहेत.या वीज उपकेंद्रातून बेलापूर,ऐनतपूर, बेलापूर खुर्द,नरसाळी,उक्कलगाव, वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,मालुंजा,लाडगाव,कान्हेगाव आदी गावातील सुमारे दहा हजार पेक्षा जास्त ग्राहकांना वीज पुरवठा होतो.मात्र मागणी जास्त होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होणे,बिघाड होणे आदी प्रकार होतात. या प्रकारांमुळे ग्राहक वैतागले असून यातून सुटका करण्याची मागणी वारंवार ग्राहक करीत होते.याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २९ मार्च रोजी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना कार्यवाहीबाबत अवगत केले.त्यावर त्यांनी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.हा प्रस्ताव सादर होऊन अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर बेलापूर वीज उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता वाढून विजेच्या खेळखंडोबाच्या जाचातून ग्राहकांची सुटका होणार आहे.

       दरम्यान याबाबत पाठपुरावा करून कार्यवाही केल्याबाबत जितेंद्र तोरणे व रणजित बनकर यांनी खासदार लोखंडे यांचे आभार मानले आहेत.तोरणे यांनी श्रीरामपूर येथे होणाऱ्या २२० केव्ही वीज केंद्रासाठीही विशेष पाठपुरावा केला आहे.त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.अनेक वेळा निवेदन देऊनही पाठपुरावा केला होता.

श्रीरामपूर - भारतीय संविधान दिन व आम आदमी पार्टी चा वर्धापन दिन च्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

श्रीरामपूर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले असताना  नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरची धुळीची विल्हेवाट लावण्याची विनंती केलेली असून सुद्धा शहरातील वाढत्या रस्त्यावरील माती धुळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार सांगून देखील फक्त काम केल्याचा दिखावा करत नगरपालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचे लक्षात आल्याने आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर आम आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रीरामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ आणि हनुमान मंदिर परिसरात समोरील रस्त्यालगत  रस्त्यालगतची स्वच्छता करून तेथील माती, डिव्हायडर मधला कचरा, उचलून त्या ठिकाणी पाणी मारून स्वच्छता केली. या पुढील काळात आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपुरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष डुंगरवाल यांनी व्यक्त केला.यापुढे नगरपालिका प्रशासनाने शहरातील धूळ व कचरा व्यवस्थापनाच्या कामाकडे बारकाईने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडून प्रशासनाला जाग आणण्याचे काम हाती घ्यावी लागेल असा इशारा यावेळी विकास डेंगळे व प्रवीण जमदाडे यांनी दिला. त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पुष्पहार अर्पण करून  पूजन केले यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे ,भरत डेंगळे, जिल्हा प्रवक्ते एडवोकेट प्रवीण जमधडे, मार्गदर्शक श्रीधर कराळे, युवा चे अक्षय कुमावत ,यशवंत जेठे, विकी लोंढे, प्रशांत बागुल, दीपक परदेशी, बी एम पवार, विजय बारसे , दिलीप उबाळे ,राहुल लुक्कड, डॉक्टर प्रवीण राठोड, डॉक्टर सचिन थोरात,सलीम शेख, भैरव शेठ मोरे, आदी उपस्थित होते

बेलापुर  (प्रतिनिधी )महाराष्ट्र  शासनाच्या वतीने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या करीता शंभर रुपयात साखर तेल रवा व चनाडाळ हा आनंदाचा शिधा श्रीरामपुर तालुक्यात पोहोच झाला असुन त्याचे वितरण उपविभागीय आधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण गोपीनाथ शिंदे शिवाजी सईद माणिक जाधव गोदाम व्यवस्थापक अर्जुन सानप गोदामपाल मिलींद नवगीरे पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले आहे.  सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्व दुकानदारांनी आंनदाचा शिधा प्रत्येक कार्डधारकांना मिळेल याची काळजी घ्यावी तसेच दुकानात माल पोहोच होताच दुकानदारांनी तात्काळ वाटप सुरु करावे कुणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी तक्रार येणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान आय एस ओ मानांकन करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर अनेक बैठका घेवुन सर्व सुचना व मार्गदर्शन करण्यात येवुनही अजुन पर्यत तयारी झालेली नसुन दुकानदारांनी महीना अखेरपर्यत सर्व तयारी करावी अशी सक्त सुचना पुरवठा निरीक्षण अधिकारी दत्तात्रय भावले यांनी दिली                           जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने आय एस ओ करावयाची असुन श्रीरामपुर तालुक्यातील दुकानाचा आढावा घेण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी भावले यांनी बैठक बोलवीली होती त्या वेळी दुकानदारांना मार्गदर्शन करताना भावले म्हणाले की  रंग रंगोटी करणे, रजिष्टर अद्यावत करणे, सर्वत्र एकाच आकाराचे फलक लावावेत, राज्य सरकारने दिलेल्या पुर्तता करून महीना अखेरी पर्यंत सर्व धान्य दुकाने सज्ज करा .

राज्य सरकारने आय एस ओ मानांकना करीता ९१ प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांच्या अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन केले आहे, त्याच बरोबर तहसिलदार प्रशांत पाटील यांनीही तालुकास्तरावर वेळोवेळी  बैठका घेऊन मार्गदर्शन केले, त्यानुसार अनेक दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात सर्वांना एकाच आकाराचे फलक व रजिष्टर देण्यात आले आहेत. उर्वरीत पुर्तता दुकानदारांनी करायची आहे. 

 त्यानुसार आता उर्वरीत दुकानदारांनी यात लक्ष घालून या महिना अखेरी पर्यंत आय एस ओ मानांकनासाठी सज्ज व्हायचे आहे.

ज्या दुकानदारांना आय एस ओ मानांकन प्राप्त होईल त्यांना लवकरच सरकार कडुन सी एस सी केंद्रा सारख्या पुढील व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार  असल्याचे ही यावेळी श्री भावले यांनी सांगितले.

या वेळी श्रीरामपूर तालुका गोदामाच्या धान्य पुरवठ्यात मार्च महीन्या पासुन मोठ्या प्रमाणात तुटवडा येत असल्याने तालुक्यांच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. रेशनकार्ड धारक व दुकानदारांत विनाकारण वाद होत आहेत.सध्या सणासुदीचे व पावसाळ्याचे दिवस आहेत. अन्न धान्यांची नितांत गरज आहे.

आम्ही आय एस ओ करीता प्रयत्नशिल आहोत पण तुम्ही आम्हाला वेळेवर धान्य पुरवठा करा . अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी केली.या वेळी नायब तहसीलदार अभया राजवळ पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे  तालुकाध्यक्ष बजरांग दरंदलेआदिसह गोपीनाथ शिंदे, दिलीप गायके, माणीक जाधव, सुभाष चोरडीया, प्रकाश गदिया, मुरली वधवाणी, चंद्रकांत गायकवाड, देवराम गाढे, अनिल मानधना, योगेश नागले, अजीज शेख, एकनाथ थोरात, सुधिर गवारे,  नरेंद्र खरात, उमेश दरंदले, मच्छींद्र भालके,  श्याम पवार, सचीन मानधने, बाळकृष्ण कांगुणे, विजय मैराळ, राजन वधवाणी, धनु झिरंगे, वासुदेव वधवाणी आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते.

बेलापुर (प्रतिनिधी )- गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये या करीता अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी बेलापुर येथील प्रवरा नदीवरील गणपती विसर्जन जागेची पहाणी करुन बेलापुर ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचा योग्य त्या सुचना दिल्या , बेलापूरात एकुण सोळा गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असुन सर्व गणेश मंडळ गणेश विसर्जन हे बेलापूर नदीवरील पुलाजवळच करत असतात तसेच प्रवरा नदीला पाणी असल्यामुळे श्रीरामपुर येथील गणेश मंडळेही गणपती विसर्जन करण्याकरीता बेलापुरला येतात त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीरामपुरच्या पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत गणेश विसर्जन स्थळाला भेट दिली. या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे व ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी गणेश विसर्जन नियोजनाबाबत  माहीती दिली या वेळी आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करा बँरेकेट़्स लावा सीसीटीव्ही कँमेरे बसवा गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी संबधीतांना दिल्या .गणेश विसर्जना दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोहणाऱ्या तरुणांची टिमही तयार ठेवण्यात आली असुन तीच मुले नदी पात्रात जावुन गणेश विसर्जन करतात इतरांना खोल पाण्यात जावु दिले जात नाही तसेच या ठिकाणी बँरेकेट़्स तसेच ठिकठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले   या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी नगरपालीकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे हवालदार अतुल लोटके हरिष पानसंबळ पत्रकार देविदास देसाई,ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक,विशाल आंबेकर  तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बेलापुर  ( वार्ताहर ) श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या टाकळीभान ग्रामपंचायतीचे एकाच वेळेस दहा सदस्य अपात्र ठरविण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असुन घुमनदेव नंतर टाकळीभानचे सदस्य  अपात्र झाले असुन आता तालुक्याबरोबरच जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे              घुमनदेव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे अपात्र झाल्यानंतर आता राजकिय प्रतिष्ठा असलेल्या व नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांवर सरकारी जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणाने ग्रामपंचायत आधिनियमातील तरतुदी नुसार सदस्यपदी रहाण्यास अपाञ ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एवढीमोठी कारवाई झाल्याने व सरपंच व उपसरपंच एकाच वेळी अपाञ झाल्याने ग्रामपंचायत कामकाजाचा गुंता वाढल्याने पुन्हा प्रशासकिय राज सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.

           टाकळीभान ग्रामपंचायतीची १८ जानेवारी २०२१ ला मोठी चुरशीची निवडणुक झाली होती. जिल्हाभर या निवडणुकिची चर्चा रंगली होती.  माजी सभापती नानासाहेब पवार यांची एकहाती सत्ता मतदारांनी उलथुन टाकत निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या तरुण उमेद्वारांच्या बाजुने  कौल देत १७ पैकी १६ सदस्य विजयी करुन एकहाती सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. महाविकास आघाडीत माजी आ. भानुदास मुरकुटे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने सरपंच व उपसरपंच निवडीत मुरकुटे गटाने बाजी मारली होती  माञ मुरकुटे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना व स्थानिक गावपुढार्यांना हा आनंद फार काळ पचवता आला आला नाही. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायत कारभारात अंतर्गत धुसफुस सुरु झाल्याने कलह वाढत गेला.

           नुकत्याच निवडुन आलेल्या १० ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहात असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४ ( १ )( ज - ३ ) व १६ प्रमाणे या सदस्यांची झालेली निवड बेकायदेशिर असल्याने त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपाञ झाले आहे टाकळीभान ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण  केले असुन त्याचे सदस्यपद रद्द करावे असा विवाद अर्ज २९ जुन २०२१ रोजी जेष्ठ शिवसेना नेते राधाकृष्ण वाघुले यांनी प्रभाग १ च्या सदस्या सविता पोपट बनकर, प्रभाग २ चे अशोक लालचंद कचे, सुनिल तुकाराम बोडखे व लता भाऊसाहेब पटारे, प्रभाग ३ चे संतोष अशोक खंडागळे व अर्चना शिवाजी पवार, प्रभाग ४ चे सरपंच अर्चना यशवंत रणनवरे व कल्पना जयकर मगर, प्रभाग ५ च्या कालिंदा बाबासाहेब गायकवाड व दिपाली सचिन खंडागळे यांच्या विरोधात विवाद अर्ज अहमदनगर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल केला होता.

      या दाखल विवाद अर्जाची वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात घेण्यात आली. गटविकास आधिकारी श्रीरामपुर यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करुन जिल्हाधिकारी यांना आहवाल सादर केला होता. या सर्व पुराव्यांच्या कागदपञांची पडताळणी करुन जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार राधाकृष्ण वाघुले यांचा विवाद आर्ज मंजुर करत वरील पैकि १० सदस्यांना सदस्यपदी रहाण्यास आपाञ ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे लेखी आदेश दिले आहेत. तर विभागिय आयुक्तांकडे अपिलासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

         या निर्णयामुळे सतरा सदस्य आसलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचासह १० सदस्य आपाञ ठरवले गेल्याने व त्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने  केवळ ७ सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सदस्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने व आर्थिक व्यवहार ठप्प होणार आसल्याने ग्रामपंचायतीवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ति होवुन प्रशासकिय राज सुरु होणार का ? याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आसल्याने सरकारी जागेत अतिक्रमण करुन रहाणार्या सदस्यांचे धाबे दणानले आहे. जिल्हाधिकारी यांच्या या निकालामुळे विरोधी गटात माञ खुशी निर्माण झाली आहे.

 जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे ग्रामपंचायतीचा प्रभाग क्रमांक २ व ३ चे सर्व सदस्यांचे सदस्यपद रद्द झाल्याने हे दोन्ही प्रभाग पोरके झाले आहेत तर प्रभाग ४ मधील सरपंचासह दोन महीला, प्रभाग १ मधील एक महीला तर प्रभाग ४ मधील दोनमहीला आपाञ झाल्या आहेत. प्रभाग ६ माञ सुरक्षित राहीला आहे. या १० सदस्यांच्या अपाञञेत ७ महीला सदस्य अपाञ ठरल्या आहेत. सभासदत्व रद्द झालेल्या दहा सदस्यांनी निवडणुकित प्रतिज्ञा पञ सादर करताना चुकिची माहीती देवुन शासनाची फसवणुक केलेली असल्यामुळे हे सदस्य अपात्र करावेत अशी मागणी शिवसेनेचे राधाकृष्ण वाघुले यांनी केली होती

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-शासनावर येणारा आर्थिक भार कमी होण्याच्या दृष्टीने तसेच योग्य व गरजु लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळावा या करीता सधन व्यक्तीनी अनुदानातुन बाहेर पडावे असे अवाहन श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे             शासनाने गरजु व्यक्तीना कमी दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले असुन आजही बरेच लाभार्थी शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेपासुन दुर आहे गाव व शहर निहाय ठरवुन दिलेला ईष्टांक पुर्ण झाल्यामुळे गरजुंना लाभ देणे शक्य होत नाही . अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे कालांतराने उत्पन्न वाढले असेल तर त्यांनी या योजनेतुन बाहेर पडावे आपण असे केल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरीता शासनावर येणारा आर्थिक भार कमी होणार आहे आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्या निमित्ताने कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील व्यक्ती शासकीय निमशासकीय स्तरावर नोकरी करत असेल कुणी व्यापारी उद्योजक असाल आपले उत्पन्न वाढलेले असेल आपण सधन असाल तर आपण स्वताःहुन अन्नधान्याचा लाभ सोडावा .आपले आधार कार्ड  सर्व ठिकाणी लिंक करण्यात आलेले आहे त्यामुळे कुणीही आपले उत्पन्न लपविण्याचा प्रयत्न करु नये. सधन व्यक्तीनी स्वेच्छेने अनुदानाचा लाभ सोडावा या करीता असणारा फाँर्म संबधीत स्वस्त धान्य दुकानदार श्रीरामपुर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग झेराँक्स सेंटर यांच्याकडे उपलब्ध आहेत.  शहरी भागाकरीता 59 हजार रुपये व ग्रामीण भागाकरीता 44 हजार रुपये उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली असुन या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या सधन व्यक्तींनी  धान्याचा लाभ सोडावा असे अवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे .

श्रीरामपूर : शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांना, मागील निवडणूकिवेळी विकासाच्या नावाखाली दिलेले आश्वासने फौल ठरल्याने. आता नागरिक मूलभूत सुविधांसाठी आवाज उठविण्यास सुरवात झाली आहे. अशाच प्रकारे शहरातील वार्ड नंबर २, प्रभाग क्रमांक १० मधील बिफ मार्केट व नवीन घरकुलाच्या मागील परिसरातील नागरिकांना, चिखलाने बरबटलेले आणि खड्डेयुक्त रस्ते, भागातील नाल्यांवरील चैंबरचे फुटलेल्या ढाप्यांमुळे, परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रभागातील या परिस्थितीमुळे लहानांपासून, वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने. जरीया फाऊंडेशनच्या वतीने मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जावेद अहमद शेख, इम्रान अजिज शेख, सद्दाम ईस्माईल कुरेशी ,इम्रान भिकन पठाण,जावेद खालीद मलिक,गणेश प्रकाश शेवाळे, शाहरूख शफिक शेख,इम्रान ईस्माईल कुरेशी आदींसह जरीया फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget