सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न
बेलापूर (प्रतिनिधी)- येथील सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने वार्तालाप,हळदी कुंकू व स्नेहभोजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा महिलांनी व सत्यमेव जयते ग्रुपच्या सदस्यांनी तसेच बाळ गोपाळानी मन मुराद आनंद लुटला. सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने नुकताच अनमोल रसवंती गृह याठिकाणी सहकुटुंब हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या उपक्रमाचा उद्देश सांगताना सत्यमेव जयते ग्रुपचे देविदास देसाई व अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की महिलांना दररोजच्या कामातून थोडीशी मोकळीक मिळावी किचन, टीव्ही आणि मोबाईल या विळख्यातून महिलांना बाहेर काढण्याकरिता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेकांनी आपली कला सादर केली इरफान जागीरदार यांनी दाताने नारळ सोलून दाखविला अनेकांनी सुंदर असे उखाणे घेऊन या कार्यक्रमाचे रंगत वाढवली काहींनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच चुटकुले विनोद सांगितले कार्यक्रमाची सुरुवात किरण गागरे यांच्या अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान या भजनाने झाली अनेक महिलांनीही या मनमुराद गप्पागोष्टी मध्ये सहभाग नोंदविला व आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली यावेळी सौ प्रतिभा देसाई रत्नमाला डावरे मानवी खंडागळे राजश्री गुंजन आरती अंबिलवादे नयना बोरा जयश्री अमोलिक कावेरी गागरे मयुरी आंबेकर योगिता काळे तुझ्या दाणी सोनाली देवरे सुवर्णा सोनवणे संगीता घोंडगे संजीवनी सूर्यवंशी यांच्यासह अभिषेक खंडागळे देविदास देसाई, विष्णुपंत डावरे,संजय भोंडगे, दिपक क्षत्रिय, संपत बोरा, किरण गागरे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, बाबासाहेब काळे, बाबुलाल पठाण, इरफान शेख,संदिप सोनवणे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,गोपी दाणी,सुरेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते
Post a Comment