तांत्रिक दोषामुळे रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानाच्या इ पॉज मशिनवर मराठीमध्ये फीडिंग झालेल्या शिधापत्रिका धारकांचे बिलच होत नसल्यामुळे गोरगरिबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली असून या बाबत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे . माहे सप्टेंबर महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून उशिरा धान्य वाटप सुरू झालेले आहे त्यातच इ- पॉज मशीन वर मराठी भाषेत फीडिंग केलेल्या ऑनलाईन रेशन कार्डचे धान्याचे बिलच निघत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वितरणव्यवस्थेचा गोंधळ उडालेला पहावयास मिळत आहे . कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये विनाकारण वादावादी होत आहेत इंग्रजी डाटा फीडींग असलेल्या कार्डधारकाचे बिल निघत आहे. त्यामुळे दुकानदार त्यांना धान्य देतात. परंतु मराठी भाषेत कार्डधारकांंची नावे भरलेली असलेल्या लाभधारकांचे बिलच निघत नसल्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही त्यामुळे अनेक कार्डधारक धान्यापासून वंचित राहू शकतात . पॉज मशीन मध्ये झालेल्या या बदलामुळे कार्डधारकही वैतागले आहेत मागील महिन्यात धान्य मिळाले मग आत्ताच का देत नाही असाही सवाल लाभधारकांकडून विचारला जात आहे.त्यामुळे शासनाने तातडीने पाज मशीन मध्ये दुरुस्ती करावी जेणेकरून सर्वांना सुरळीत धान्य मिळेल. याबाबत विशेष माहिती घेतली असता असे समजले की महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात ओयासिस कंपनीचे ई पॉज मशीन आहे त्याच मशीनला ही समस्या निर्माण झालेली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने त्यात दुरुस्ती करावी अशी कार्डधारकांची मागणी आहे याबाबत ऑल महाराष्ट्र फेर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांचे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत मंत्रालयातील संगणक कक्ष अधिकारी प्रज्ञा पटेल यांच्याशी संपर्क केला असून दोन दिवसात ही समस्या सुटेल असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आल्याचे डोळसे पाटील यांनी सांगितले. अहिल्या नगर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटपात आलेले अडचण तातडीने दूर करावे अशी मागणी दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सतीश हिरडे व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष काशिनाथ आरगडे यांनी केली आहे
Post a Comment