यात एका स्वयंसेवक गटाने मिरवणूक ज्या मार्गाने गेली, त्या मार्गाची तात्काळ स्वच्छता केली. त्यांच्या या कृतीतून 'स्वच्छता हाच धर्म' असा संदेश देण्यात आला. या तरुणांनी मिरवणुकीचा उत्साह कायम राखत सामाजिक भान जपले, ज्यामुळे नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.तर एका गटाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन ते देखील मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार व औषधे अश्या शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार दिला गेला. धार्मिक उत्सवादरम्यान आरोग्यसेवेसारख्या उपक्रमामुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला.काही गटांनी पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी आणि शांततेच्या शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांनी त्यांच्या विचारांचे फलक तसेच ऐतिहासिक आठवणीतल्या पुरातन काळातील वस्तू आणि माहितीपत्रके घेऊन लोकांना सर्वधर्म समभाव, सलोखा आणि एकता या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
एकंदरीत, यावर्षीची ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक धार्मिक उत्साहासह सामाजिक कार्याचा एक आदर्श बनली आहे. या उपक्रमांनी पैगंबरांच्या शिकवणुकीला केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही लोकांपर्यंत पोहोचवले. याचीच दखल घेत ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज एन एम पी परिवाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले असून, पुरस्कार जाहीर केलेली नावे पुढीलप्रमाणे एकता नगर सोशल ग्रुप, ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन, एन आर सी सी ग्रुप आणि मंत्री फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्टी, गवंडीपुरा मस्जिद ट्रस्टी अशा एकूण पाच संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3=00 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सय्यद बाबा चौक या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष वसीम उर्फ गुड्डूभाई सय्यद अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख, महासचिव जमीर शेख, यांनी दिली आहे
Post a Comment