गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सपोनि जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. आरोपी अमजद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये विमल ब्रॅण्डचा केसरयुक्त पान मसाला व तंबाखू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला.
तसेच घरामध्येही प्रतिबंधित मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या उपस्थितीत घराचे कुलूप उघडण्यात आले. घराची झडती घेतली असता तेथेही मोठ्या प्रमाणात सुगंधी पान मसाला व तंबाखू सापडला. सर्व मुद्देमाल पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला.
जप्त केलेला मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,०६,१८४/- एवढी असून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेश बडे यांना तातडीने कळविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्याची तजवीज करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारने गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेला बंदी आदेश काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. नागरिकांनीही अशा अवैध व्यापाराविषयी माहिती पोलिसांना दिल्यास तातडीने कडक कारवाई केली जाईल.
Post a Comment