सह 4,8,12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार लॉज मालक,वय 27 वर्ष रा शिगवे नाईक याने यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम 55 Bns सह कलम 17 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम वाढ करून त्यास अटक केली असून. न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीने गुन्ह्यास मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपीस गुन्हा करण्यास मदत केली म्हणून सदर लॉजच्या मालकास या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार आरोपीला आजन्म करावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा व द्रव्य दंड अशी शिक्षा नमूद करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने दाखल सर्वच गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. गुन्ह्यामध्ये तपासादरम्यान लॉज /हॉटेल चालक, मालक यांचा निष्काळजीपणा व अप्रत्यक्ष /प्रत्यक्ष सहभाग दिसन आल्यास वरील प्रमाणेच हॉटेल मालक लॉज मालक कॅफे रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हॉटेल लॉज कॅफे मालकांनी याची खबरदारी घ्यावी की आपण रूम देताना अल्पवयीन मुला-मुलींना तर रूम देत नाही ना वयाची पडताळणी करूनच आपला व्यवसाय करावा अन्यथा चुकीचे काम केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे
Post a Comment