बेलापूरला गावकरी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवनिमित्त रविवारी चित्रकला स्पर्धा

बेलापूरः गावकरी मंडळ व  ग्रामस्थ बेलापूर बु -ऐनतपूर यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रविवार (दि.३१)होणाऱ्या चिञकला स्पर्धा बेलापूर-ऐनतपूर येथील मुलांसाठी मर्यादित आहे.स्पर्धा दोन गटात होणार आहे.छोटा गट((इयत्ता १ली ते ४ थी*)करिता मुक्त चित्र हा विषय आहे.यासाठी

प्रथम क्रमांक रु. ११११/-(श्रेया मोटर्स,श्रीरामपूर रोड, )

द्वितीय क्रमांक रु. ७७७/-(शुभम जनरल व झेरॉक्स)तर तृतिय क्रमांक:-रुपये ५५५/-

(गुरुकृपा फोटो स्टुडीओ.)याप्रमाणे बक्षिसे असतील              

       मोठा गट ( इयत्ता ५ वी ते १० वी.)करिता

 माझे आवडते व्यक्तीमत्व, ऐतिहासिक किंवा पौराणिक प्रसंग,

ऑपरेशन सिंदूर असे विषय आहेत.या गटासाठी प्रथम क्रमांक रु. २२२२/-

(भागवत प्रतिष्ठान,बेलापूर बु.)

द्वितीय क्रमांक:-रुपये ११११/-(श्री. रामेश्वर सोमाणी, व्हा.चेअरमन, गावकरी पतसंस्था, .) तरतृतीय क्रमांक रु. ७७७/-

(विशाल मंडप डेकोरेटर्स.)याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.       

        चित्र काढण्यासाठी कागद संयोजकांकडून देण्यात येईल. स्पर्धकांना चित्र स्पर्धेच्या दिवशी निर्धारित वेळेतच काढून पूर्ण करावे लागेल. चित्र काढण्यासाठी व रंगविण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी आणावे. स्पर्धकांनी रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजे पर्यंत संत सावता मंदिर(अरुणकुमार वैद्य पथ)या ठिकाणी उपस्थित राहावे. स्पर्धकांनी आपली नावे               

 प्रमोद जनरल स्टोअर्स, मेनरोड, बेलापूर बु (श्री. हेमंत मुथ्था मो. ८८३०८४८०९०) सुदर्शन सुपर शॉपी, मेनरोड, बेलापूर बु (श्री. सुधीर करवा, मो.९०११७९४४९८)व

महावीर शॉपी & जनरल स्टोअर्स, मेनरोड, बेलापूर बु (श्री. संतोष ताथेड, मो.८७९३६३७२६३)येथे नोंदवावीत जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget