मिळालेल्या माहितीनुसार, सुज्ञ नागरिक यांनी नंदकिशोर लोखंडे यांना बाजारात एक संशयित निळ्या रंगाची मारुती ८०० गाडी उभी असल्याची माहिती दिली. तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली. पेठेतून झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने आरोपी फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच, नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून संशयितांचा पाठलाग करण्यास सांगितले. तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून, तर जाधव साहेब आणि कोळपे दादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून संशयितांचा पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले.
पोलिसांच्या या थरारक पाठलागादरम्यान, भरधाव वेगाने पळणाऱ्या निळ्या रंगाच्या मारुती ८०० गाडीचा लाडगाव रेल्वे चौकीजवळ ताबा सुटला आणि ती पलटी झाली. या अपघातात गाडीतील तीनही संशयित जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पलटी झालेली गाडी बेलापूर आऊटपोस्ट येथे आणण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment