संत सावता महाराजांचे चरित्र अभ्यासणे आवश्यक- ह भ प महांकाळे
बेलापूर (प्रतिनिधी)-संत सावता महाराज म्हणजे प्रेमाचे प्रतीक असून त्यांचे प्रेरणादायी चरित्र तरुण पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे असे संमत हरिभक्त परायण अनिल महाराज महांकाळे यांनी व्यक्त केले . संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त बेलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काल्याच्या कीर्तनात ह.भ . प. अनिल महाराज महांकाळे बोलत होते श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ह भ प अनिल महाराज महांकाळे म्हणाले की प्रत्येकाने आपले कर्म करताना आपल्या कर्माशी प्रामाणिक असले पाहिजे. आज समाजात वाढत असलेली अराजकता ही चिंतेची बाब आहे समाजाला योग्य दिशा देण्याकरता संत सावता महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. संकटाला घाबरून आत्महत्या करू नका नैराश आले तरी चुकीचा मार्ग निवडू नका आपल्या कामाला भक्तिमार्गाची जोड द्या जिवन अधिक सुखकर होईल असेही ते म्हणाले . प्रारंभी गावातून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी अनेकांनी आपल्या घरापुढे सडा रांगोळी काढली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर अनेक मान्यवरांनी श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ही महाराजांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीते साठी हे भ प मयुर महाराज बाजारे, ह भ प कृष्णा महाराज शिरसाठ, संजय महाराज शिरसाठ,जालिंदर कुर्हे, विलास मेहत्रे, प्रकाश कुऱ्हे ,राजेंद्र टेकाडे ,राजेंद्र सातभाई ,अशोक महाराज शिरसाठ, बबन महाराज अनाप, साईनाथ महाराज शिरसाठ, चांगदेव मेहेत्रे, अर्जुन कुर्हे, मधुकर अनाप , तुकाराम मेहेत्रे, गोरक्षनाथ कुर्हे ,सोमनाथ शिरसाठ सचिन नगरकर संदीप कुर्हे, महेश कुऱ्हे केशव कुर्ते, रमेश लगे, चंद्रकांत रासकर, संदीप कुऱ्हे ,वैभव कुरे ,अमोल मेहेत्रे ,रवी मेहेत्रे, भैय्या शिरसाठ, कान्हा लगे ,बाळासाहेब टेकाडे ,ज्ञानेश्वर शिरसाठ, दादा कुऱ्हे, तुकाराम मेहेत्रे,शरद गायकवाड ,अशोक कुर्हे, विशाल मेहत्रे बबलू कुर्हे भाऊसाहेब लगे तुषार जेजुरकर कार्तिक मेहत्रे किरण कुर्हे सागर कुर्हे चेतन कुर्हे सौरभ लगे अशोक दुधाळ अमोल आनाप अच्युत कुर्हे प्रफुल्ल कुर्हे योगेश कुर्हे बाळासाहेब टेकाळे सागर कुर्हे प्रकाश दुधाळ अनिल कुर्हे गौरव कुर्हे आदींनी विशेष प्रयत्न केले
Post a Comment