बेलापूर पोलिसांकडून विना नंबरच्या व फॅन्सी नंबरच्या दुचाकीवर कारवाई
बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून आल्या त्या गाड्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. त्यात 19 दुचाकी विना नंबर तसेच फॅन्सी नंबरच्या दुचाकी आढळून आल्या एका मोटरसायकलवर तर चक्क नंबर प्लेटच्या जागी नंबर न टाकता सरपंच लिहिलेले होते या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख याच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे , पोहेकॉ सचिन गायकवाड,पोकॉ संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, रविंद्र अभंग, पंकज सानप ,महेश थोरात आदिंची ही कारवाई केली. पकडलेली गाडी सोडविण्याकरता अनेकांनी आपल्या मित्रांना पुढार्यांना फोन लावले परंतु कारवाई का केली हे सांगताच त्यांनीही फोनवर तुमच्या पद्धतीने काय असेल ते करा असा सल्ला पोलिसांना दिला.
Post a Comment