कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.
नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.
७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.
इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.
Post a Comment