सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावाला 20 बाकडे भेट
बेलापूर (प्रतिनिधी)-सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावातील शासकीय कार्यालय तसेच मंदिर, मज्जिद, चर्च या ठिकाणी नागरिकांना व भाविकांना बसण्यासाठी म्हणून 20 बाकडे भेट देण्यात आले आहे.बाकडे लोकार्पणाची सुरुवात स्वामी समर्थ केंद्रा पासून करण्यात आली.सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द तलाठी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता बाकडे भेट देण्यात आले. त्याचबरोबर बेलापूर गावातील मंदिर ,मज्जिद व चर्च याही ठिकाणी बाकडे भेट देण्यात आले. या वीस बाकड्यांची अंदाजीत किंमत 50 हजाराच्या आसपास असून या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा काल श्री स्वामी समर्थ मंदिर कुर्हे वस्ती बेलापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी विठ्ठल गाडे मामा व अन्य सेवकर्यांच्या तसेच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांचे उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना चार बाकडे भेट देण्यात आले. यावेळी बोलताना सेवेकरी विठ्ठल गाडे मामा म्हणाले की सत्यमेव जयते ग्रुपने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली त्यांनी सर्व धर्म समभाव लक्षात घेऊन मज्जिद असेल चर्च असेल त्याचबरोबर तलाठी कार्यालय याही ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. यावेळी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे अभिषेक खंडागळे देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.या वेळी सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपचे राधेश्याम अंबिलवादे,सचिन वाघ, बाबासाहेब काळे,दिलीप अमोलीक,दिपकसा क्षत्रिय सचिन कणसे,विलास नागले, विशाल आंबेकर,भगीरथ मुंडलिक, नंदकिशोर दायमा,बाबुलाल पठाण, जाकीर शेख,औदुंबर राऊत,गोपी दाणी, महेश कुऱ्हे, संजय भोंडगे,महेश ओहोळ आदिंसह नागरिक उपस्थित होते.
Post a Comment