बेलापुरातील महेश दायमाने वेदोत्सवात मिळविली प्रथम क्रमांकाची सुवर्णमुद्रीका
बेलापूर (प्रतिनिधी )-महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आळंदी येथे पाच दिवसीय वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सव परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील व बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव बटुक महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका पटकाविली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आळंदी येथे वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सवात महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या सर्व 40 विद्यालयांमधून तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पाच दिवस चालल्येल्या या स्पर्धेमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा ,संपूर्ण शुक्ल यजुर्वेद मध्यादिन संहिता या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत या गुरुकुलातील बटुक महेश दिलीप दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्याला त्याबद्दल सुवर्णमुद्रिका तसेच चांदीचे पंचपात्र सेट देऊन त्याचा सन्मान प्रभू श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दधिमती गुरुकुलचे गुरुजी आचार्य वेदमूर्ती श्री कमलकिशोर जोशी याचाही सन्मान या वेळी करण्यात आला. महेश दायमा हे बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव आहेत. यावेळी प्रधानाचार्य कमल किशोर जोशी यांचाही मंहत गोविंद देवगीरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या प्रथम क्रमांकाच्या सन्मानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महेश दिलीप दायमा यांने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका मिळवली ते महेश दायमा हे बेलापूरचे आहेत तसेच त्यांचा सत्कार करणारे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी जी महाराज यांची जन्मभूमी देखील बेलापूर आहे.महेश दायमा याने राजस्थान येथील दधिमती वैदिक गुरुकुलात वैदिक शिक्षण घेण्याकरता प्रवेश घेतला होता .आज पाच वर्षे झाली त्या संस्थेत वैदिक ,धार्मिक, वेदशास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी प्रथम येण्याचा मान महेश ने मिळवला आहे . त्याला असलेली आवड व रुची लक्षात घेऊन गुरुकुलाच्या प्रमुखांनी त्याची पुढील शिक्षणासाठी वाराणसी येथे निवड केली होती . महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी महेश दायमा यांचा सन्मान करतांना त्याची आस्थेने चौकशी करून पुढील वाटचालीस भरभरून शुभाशीर्वाद दिलेत .महेश दायमा यास दधिमती वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा ,सचिव हरिनारायण व्यास ,कोषाध्यक्ष जय किशन संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी तसेच सुभाष मिश्रा आदींचे मार्गदर्शन लाभले
Post a Comment