इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती राहिली नाहीपोलिस उपनिरीक्षक चौधरी
बेलापूर (प्रतिनिधी) वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल, वाचाल तर टिकाल आणि वाचनासाठी गरज आहे ती पुस्तकाची. वाचनाने वक्ता, श्रोता, नेता तयार होतो त्याचबरोबर उत्तम श्रवण कौशल्य जीवनात योग्य मार्ग दाखवित असल्याचे मत सात्रळ कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे सिद्धेश्वर ग्रामीण ग्रंथालय व वाचनालय आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या सांगता समारोहप्रसंगी तसेच संस्थेने घेतलेल्या वकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आदिनाथ वडीतके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, वनपाल अक्षय बडे ह. भ. प. बापूसाहेब चिंधे,प्रशांत विटनोर,सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात प्राध्यापक शिंदे म्हणाले की आज समाजात समाजासाठी धडपड करणाऱ्या माणसाची उणीव भासत आहे प्रत्येक जण स्वतःच हित पाहून कार्य करत आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले नसते आज समाजासाठी धडपडणारे माणसं खूप कमी आहे पुस्तक हे माणसाचं मन निर्मळ करणारी साबण आहे. असेही प्राध्यापक शिंदे म्हणाले.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी म्हणाले की इंटरनेटच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे. तरुणांमध्ये संयम राहिलेला नाही रागाच्या भरात तरुणांकडून अनेक अपराध घडत आहेत. शासनाने राबविलेले वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. असेही पोलीस उपनिरीक्षक चौधरी म्हणाले.
सचिव सुनील शिंदे यांनी प्रस्तविक केले वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्याच्या सांगता समारोह कार्यक्रम प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथालय परिसराची सामूहिक स्वच्छता, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन आदी उपक्रम राबविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जानेवारीपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत राबविला आहे. आज आपल्या ग्रंथालयामध्ये १३४६५ ग्रंथ उपलब्ध असून नियमित वचकांसाठी १३ वृत्तपत्र व मासिकही उपलब्ध आहे.असे सचिव शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ ढोणे, विद्यार्थिनी प्रिया वडीतके यांची भाषणे झाली.
यावेळी वनपाल अक्षय बडे,
ह.भ.प. बापूसाहेब चिंधे सर, सोसायटीचे चेअरमन सोन्याबापु जाटे,मुख्याध्यापक म्हसे सर, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक चित्ते मॅडम, संस्थेचे संचालक चंद्रकांत वडीतके,शिंदे सर , तुपे सर, दळवी सर,, काटकर सर, रवींद्र काळे सर, दळवी सर, सौ.शिंदे,सौ.बेलकर,पंढरीनाथ भोसले, संजय विश्वासे, वृक्षसंवर्धक अजित देठे, ग्रंथपाल सुभाष भोसले, शिवाजी कोऱ्हाळे, संदीप शेरमाळे, रमेश भोसले, इंद्रभान तुपे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रस्ताविक संस्थेचे सचिव सुनील शिंदे यांनी तर आभार सौ वाघ मॅडम यांनी मांडले.
Post a Comment