या बाबता माहीती देताना उद्योजक तोरणेयांनी सांगितले की बेलापूर येथे ३३ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र असून येथे ५ एमव्हीए क्षमतेचे तीन व ३.१५ एमव्हीए क्षमतेचे एक असे एकूण १८.१५ एमव्हीए क्षमतेचे एकूण चार रोहित्र आहेत.या वीज उपकेंद्रातून बेलापूर,ऐनतपूर, बेलापूर खुर्द,नरसाळी,उक्कलगाव, वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,मालुंजा,लाडगाव,कान्हेगाव आदी गावातील सुमारे दहा हजार पेक्षा जास्त ग्राहकांना वीज पुरवठा होतो.मात्र मागणी जास्त होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होणे,बिघाड होणे आदी प्रकार होतात. या प्रकारांमुळे ग्राहक वैतागले असून यातून सुटका करण्याची मागणी वारंवार ग्राहक करीत होते.याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २९ मार्च रोजी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना कार्यवाहीबाबत अवगत केले.त्यावर त्यांनी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.हा प्रस्ताव सादर होऊन अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर बेलापूर वीज उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता वाढून विजेच्या खेळखंडोबाच्या जाचातून ग्राहकांची सुटका होणार आहे.
दरम्यान याबाबत पाठपुरावा करून कार्यवाही केल्याबाबत जितेंद्र तोरणे व रणजित बनकर यांनी खासदार लोखंडे यांचे आभार मानले आहेत.तोरणे यांनी श्रीरामपूर येथे होणाऱ्या २२० केव्ही वीज केंद्रासाठीही विशेष पाठपुरावा केला आहे.त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.अनेक वेळा निवेदन देऊनही पाठपुरावा केला होता.
Post a Comment