
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ह भ प शितलताई साबळे यांनी व्यक्त केले नागेबाबा परिवाराकडून गळनिंब येथील भोसले परिवाराला नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत दहा लाख रुपये मदत निधी देण्यात आला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून साबळे ताई बोलत होते यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार देविदास देसाई गळनिंब येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे कॉम्रेड पांडुरंग शिंदे जानकु वडीतके आरोग्य मित्र सुभाष गायकवाड अण्णासाहेब कडनोर डॉक्टर सुनील शिंदे बबनराव वडीतके अण्णासाहेब जाटे उपस्थित होते. कोल्हार शाखेचे खातेदार व गळनिब येथील रहिवासी कै. प्रदीप इंद्रभान भोसले यांचे चार महिन्यापूर्वी आकस्मीत निधन झाले प्रदीप भोसले यांनी नागेबाबा पतसंस्थेच्या कोल्हार शाखेकडून 1500/- भरून नागेबाबा सुरक्षा कवच या योजनेअंतर्गत नाव नोंदणी केली होती. सदर योजनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेरमाळे यांना असल्याने त्यांनी संस्थेला माहिती दिली. अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यु झालेल्या प्रदीपच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. श्री संत नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजने अंतर्गत दहा लाख रुपयांचा धनादेश ह भ प शितलताई साबळे व ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या शुभहस्ते भोसले कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी आरोग्यमित्र सुभाष गायकवाड देविदास देसाई नागेबाबा परिवारातील योगिता पटारे राजू चिधे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नागेबाबा परिवाराचे सदस्य राजू भाऊ चिंधे,यशवंत मिसाळ रिजनल ऑफिसर, योगिता पटारे मॅडम, प्रशांत रासकर, नंदा बाचकर, महेश मोहिते, शुभम साबळे ,विशाल अनाप, कैलास चोखर, अमित बोरावके, योगेश भाग्यवान, आसिफ सर,अण्णासाहेब कडनोर, सरपंच शिवाजी चिंधे,मच्छिंद्र थोरात, डॉक्टर कोंडीराम चिंधे, डॉक्टर सुनील चिंधे, संजय कुदनर, बबनराव वडीतके, रामदास एनोर, अण्णासाहेब जाटे, नामदेव जाटे,संजय शिंदे, अजित देठे, संजय भोसले, चंद्रभान भोसले, इंद्रभान भोसले प्रभाकर भोसले सचिन भोसले, ग्रंथपाल सुभाष भोसले, यादी भोसले कुटुंबिय उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सूर्यभान वडीतके यांनी तर आभार सुनील शिंदे यांनी मांडले.
Post a Comment