मिरवणुकीमध्ये जवळपास ३००० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, घोडे, उंट , बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, शिवराज्यभिषेक सोहळा , विज्ञान व तंत्रज्ञानाची गगन भरारी चंद्रयान, आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौकात चौकात संबंधित नृत्य व विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी पंजाबी साउथ आदिवासी दक्षिणात्य संस्कृती वारकरी आदी नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला. सजावलेल्या ट्रॉलिमध्ये सर्वधर्मीय वेशभूषा, विविध समाज सुधारक व साधू संतांची वेशभूषा यातून समानतेचा व सर्व धर्म समभाव याचा संदेश देण्यात आला.
शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्या
चं औक्षण केलं. श्रीरामपूर आतील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रांताधिकारी किरण सावंत, डी. वाय. एस. पी. डॉ. बसवराज शिवपूजे, तहसीलदार मिलिंद वाघ, कामगार हॉस्पिटल वैद्य अधिकारी डॉ. रवींद्र जगधने , प्राचार्य पी व्ही बडधे, प्राचार्य डॉ. एस.ए. निंबाळकर, प्राचार्य डॉ.एम.एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे, सौ. जयश्री जगताप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, गणेश थोरात, सुनिल डहाळे, मेजर कृष्ण सरदार, बाळासाहेब भागडे, मा.नगरसेवक आशिष धनवटे आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण लक्षनीय ठरले.
मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, विज्ञान व तंत्रज्ञानाची भरारी चंद्रयान, स्वच्छता व आरोग्य आदिविषयांचा संदेश देणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ.विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय व डी डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकीचा समारोप कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ समारोप झाला. यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी डी काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्राफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.
कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
Post a Comment