
वांगी गावच्या हद्दीमध्ये असणार्या नदी मध्ये शासनाने वाळूचा डेपो चालु केला या डेपोचे ठेकेदार यांनी शासनाचे सर्व आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी वाळू उपसा करत आहे त्या ठेकेदारावर त्वरित फायदेशीर कारवाई व्हावी त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांत अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की शासनाने व महसूलमंत्र्यांनी नागरिकांना कमी दरात वाळू बांधकामासाठी मिळायला पाहिजे हा शासनाचा निर्णय व माननिय महसूल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांचा या निर्णयाच्या आमच्या सह संपूर्ण महाराष्ट्र तील नागरीकांनी कौतुक केले कारण की गेल्या अनेक वर्षापासून रात्री अपरात्री नदीतुन मोठ्या प्रमाणात अवैध्य रितीनी वाळू चोरी करुन नागरीकांना पाच हजार ते सात हजार रुपये ब्रास ने वाळू चोर विकायचे व वाळू चोर बेहीसाब वाळू रोजच चोरुन नेत असल्याने शासनाला त्याचा कुठलाही आर्थिक फायदा होत नव्हता व तसचे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीच्या कडेला असणार्या शेतकार्यांना नदीत वाळूचा साठा नसल्याने पाण्याचे साठवण होत नसल्याने शेतकर्यांना, शेती करण्यासाठी व तर कधी कधी मुक्या जनावरासाठी पाणी मिळत नव्हते. ह्या सर्व गोष्टीची महाराष्ट्र शासनाने व महसुल मंत्र्याने गंभीर दखल घेऊन शासनाला महसुल मिळावे व नागरिकांना कमी दरा मध्ये वाळू मिळावे व शेतकर्याच्या हीताचे विचार करुन नदीत वाळू साठा शिल्लक राहावे जेणे करुन पाण्याचे साठवण राहील व शेतकर्यांना याचा फायदा होईल ह्या सर्व गोष्टीच्या विचार करुन शासनाने ६०० रु. ब्रास ने नागरीकांना वाळू मिळावे असा कायदा बनवुन वाळू डेपो बनविले. या डेपो चालक ठेकेदाराला नियम व अटी लावण्यात आले त्यामध्ये वाळू किती ब्रॉस उचलायचे आहे व तसेच वाळू कोठून उचलायचे ते गट नंबर चे ठिकाण ठरवुन दिले आहे. तसेच पर्यावरणाचा विचार करुन वृक्षरोपण करणे वाळू उपसा करताना मोठ्या यंत्रानाचा वापर करण्यात येऊ नये म्हणजेच जेसीबी, पोकलेंड व इत्यादी मोठ्या वाहनाचा यंत्राचा अवजाराचा वापर करुन वाळू उपसा करूनही तसेच बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यात यावे असे आदेश आहे. तसेच वाळू डेपोच्या ऑफीसच्या तिथे वजन काटा लावणे व सी. सी. टीव्ही कॅमेरे लावणे वृक्षारोपण करणे व इतर नियम व अटी बंधन कारक असताना वांगी येथे सध्या चालु असललेल्या वाळूच्या डेपोच्या तिथे शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन न करता ठेकेदार स्वतः ची मनमानी करुन मोठ्या प्रमाणात पोकलैंड व इतर मोठ्या यंत्राचा वापर करुन मोठया प्रमाणात वाळू उपसा करुन शासनाचा महसुल बुडवत आहे. व मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने ह्या ठिकाणी वाळू शिल्लक न राहिल्याने शेतकरयांना शेतपिकासाठी व जनावरांनसाठी पाणी शिल्लक राहणार नाही व शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. आता सध्या पावसाळा चालु असताना देखील पाऊस नाही. अत्ताच दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. तर या अशा बे हिसाब वाळू उपसा केल्याने नदीच्या पाण्याच्या भरवशावर जे शेतकरी आहे त्यांना येत्या काळामध्ये पाण्याचे संकट येणार आहे व तेसच नायगाव गोवर्धन या ठिकारी असलेले वाळू डेपो याच ठेकेदाराचे आहे. सगळ्या वाळू डेपो कोणाच्या आशिर्वादाने एकच ठेकेदाराला मिळत आहे. याचा ही शोध शासनाने व अधिकार्याने लावावे. तसेच गोवर्धन येते असलेल्या वाळू डेपो येथे वाळू डेपो चालु झाल्या पासून ते आता पर्यंत वजन काटा नाही. म्हणजे आतापर्यंत वाळू वजन न करता ठेकेदारांनी वाळू वाहतूक केली आहे गाड्यांमध्ये नियमापेक्षा जास्त वाढवून शासनाची फसवणूक केली आहे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या गट नंबर येथून मोजकेच वाळू उचलण्यात आले इतर ठिकाणाहून जास्त वाळू उचलण्यात आली आहे तसेच शासनाच्या नियम व अटी ठेकेदाराने पायदळी तुडवले आहे याचं ठेकेदाराला वांगी येथे डेपो का देण्यात आला. वांगी येथे चालु असलेल्या वाळू डेपो येथील देखील शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन करताना संबंधीत ठेकेदार दिसत नाही. अशा मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर त्वरीत कायदेशीर गुन्हा दाखल करुन शासनाचे फसवणूक केल्याने यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व नायगाव गोवर्धन वांगी येथे ज्या गट नंबर मधून वाळू उपसा करण्याचे शासनाने ठेका दिला आहे त्या गट नंबर मधून किती वाळू उपसा झाला व शासनाला किती हिशोब दिला तसेच डेपोत किती वाळू शिल्लक आहे किती विकल्या गेले त्या सर्व वाळूची मोजमाप करण्यात यावी व सखोल चौकशी करण्यात यावी
आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या तीन ते चार दिवसांमध्ये संबंधित वाळू गटाची व वाळू डेपोच्या ठिकाणाची मोजमाप करून व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास तहसीलदार व प्रांताधिकारी देखील या वाळू चोरीमध्ये सामील आहे असे समजून शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तसेच शासनाची महसूल बुडवत असल्याने या सर्वांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्याचे महसूल मंत्री श्री विखे पाटील साहेब यांच्या घरासमोर न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलना प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास तहसीलदार प्रांत व जिल्हाधिकारी साहेब जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले
याप्रसंगी मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवतर तालुकाध्यक्ष सतीश कुदळे शहराध्यक्ष विलास पाटणी शहर सरचिटणीस नितीन जाधव शहर उपाध्यक्ष मनोहर बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment