मुस्लिम समाजाने आत्मचिंतन करून विकासासाठी पुढे यावे - अर्षद शेख,मानवता संदेश फाउंडेशनच्या पुढाकाराने मिल्लत मशिदीमधून झाला हिंदू - मुस्लिम एकतेचा जागर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - मुघलांसह विविध मुस्लिम शासकांच्या 900 वर्षाच्या इतिहासामध्ये देशांमध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद झाल्याचे इतिहासात नमूद नाही.परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये या देशाच्या एकोप्याला दृष्ट लागली. आज सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र होत असले तरी मुस्लिम समाजाने आपल्या पारंपारिक प्रथा आणि रीतींमध्ये बदल करून समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासात योगदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्यातील जुन्या चाली,रीती, परंपरांचा आढावा घेऊन योग्य त्या ठिकाणी बदल करावा.आपले इतर देश बांधवांसोबत असलेले सलोख्याचे संबंध कायम ठेवून समाजाने आपला विकास साधावा. त्यासाठी मानवता संदेश फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्थांनी आता पुढे येण्याची गरज आहे. मशिदींचा वापर केवळ नमाजसाठी न करता स्टडी सेंटर म्हणून ही त्यांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आर्किटेक अर्षद शेख यांनी व्यक्त केली.

येथील मानवता संदेश फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "हालात बदल सकते है" या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.मिल्लत नगर मधील मिल्लत मशिदीतझालेल्या या कार्यक्रमास समाजाच्या सर्व स्तरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या विकासाचा स्वातंत्र्यपूर्व व स्वतंत्र्योत्तर काळाचा आढावा घेताना शेख यांनी अनेक दाखले देत मुस्लिम समाजाचे योगदानाची सखोल चर्चा केली.देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केलेतर त्यांच्या पूर्वी अनेक मुस्लिम शासकांनी या देशांमध्ये विकासाचे पर्व सुरू केले.मुस्लिम शासकांच्या काळामध्ये कधीही हिंदू मुस्लिम वाद झाले नाहीत नऊशे वर्ष राज्य करताना त्यांनी कधीही कोणती नावे बदलली नाहीत उलट हिंदू मंदिरांना इनामी जमिनी दिल्याचा इतिहास अस्तित्वात आहे असे सांगून अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये140 कोटी लोकसंख्येमध्ये 25 कोटी असलेल्या मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे परंतु या देशातील लोकशाही अतिशय प्रबळ असल्याने योग्य वेळी योग्य ते बदल येथील जनता करीत असते ती वेळ आता आलेली आहे बदल निश्चितपणे होणार आहे त्यासाठी मुस्लिम समाजाने जागरूक राहावे आपल्या भावनांना आवर घालावा प्रतिक्रिया व्यक्त करू नये तर आपल्यामध्ये एकोपा निर्माण करून विकासाचे कार्य अव्याहतपणे पुढे न्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

प्रस्ताविक भाषणात मानवता संदेश फाउंडेशनचे प्रमुख सलीमखान पठाण यांनी आगामी काळामध्ये मुस्लिम समाजाची वाटचाल काय असावी समाजाचे मूलभूत प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबतची भूमिका निश्चित करणे आवश्यक असून त्यासाठीच अशा प्रकारची व्याख्याने आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास मुफ्ती मोहम्मद रिजवान,हाफिज अशपाक पठाण,

नगरसेवक अंजुमभाई शेख,मुख्तारभाई शाह, मशिद ट्रस्टचे अध्यक्ष रमजान पठाण,हाजी युसुफ शेख,अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा,ॲड.शफी शेख, ॲड.समीन बागवान, सलाउद्दीन शेख, सरवरअली मास्टर,

अजीज शेख,अझहर शेख, हाजी शरीफ खान,डॉ.सलीम शेख,सोहेल दारुवाला, युसूफ लाखाणी, रशीद शेख, रफिक शेख,

इरफान शेख टी सी, शकिल बागवान, जलील शेख,बदर शेख,फारुक पटेल, फिरोज पठाण, हुजेफखान पठाण, आरीफ पटेल,समीर शेख,रमजान शाह,अफरोज शाह, इम्रान पोपटिया, हाजी रियाज बागवान, शाहीन शेख आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरमामू शेख,तन्वीर शेख, खालिद मोमीन, तोफिक शेख यांनी परिश्रम घेतले. इकबाल काकर यांनी आभार मानले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget