नेवासा तालुका शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंट मेरीज स्कूलचे वर्चस्व!
नेवासा (गौरव डेंगळे): येथील त्रिमूर्ती प्रतिष्ठान येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेंट मेरीज स्कूलच्या १४ वर्षाखालील मुले व मुली आणि १९ वर्षाखालील मुले या संघांनी दणदणीत विजेतेपद मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. शालेय तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये नेवासा तालुक्यातील १६ शाळांनी सहभाग नोंदवला होता. मुलांच्या १४ व १९ वर्षाखालील झालेल्या अंतिम सामन्यात सेंट मेरीज संघाने त्रिमूर्ती संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले तर मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट मेरी संघाने त्रिमूर्ती संघाचा २-१ पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक पापा शेख व विष्णू खांदोडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योसी, व्यवस्थापिका सिस्टर मोली, सिस्टर लीसा, सिस्टर मुक्ता तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment