डॉ. अतिश मुंदडा टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित...

बेलापूर (प्रतिनिधी )--श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रहिवासी असलेले श्रीकिसन मुंदडा यांचे सुपुत्र डॉक्टर अतिश मुंदडा यांना असोसिएशन ऑफ फॉर्म्युसुटिकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एकदिवसीय परिषदेत डॉक्टर एस जी वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.   छत्रपती संभाजीनगर येथे १५फेब्रुवारी रोजी झालेल्या असोसिएशन ऑफ फार्मासुट्टीकल टीचर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या एक दिवशीय परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात चांदवड येथील एस एन जे बी संचलित श्रीमान सुरेश दादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक डॉक्टर अतिशकुमार श्रीकिसन मुंदडा यांना *डॉ. एस. जी. वडोदकर मेमोरियल टीचर ऑफ द इयर* या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रेसिडेंटच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी असोसिएशन ऑफ फार्मासुटीकल टीचर्स ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. सोहन चितलांगे तसेच महाराष्ट्र शाखेचे प्रेसिडेंट डॉ. राकेश सोमानी व व्हाईस प्रेसिडेंट डॉ. स्वरूप लाहोटी आणि डॉ. शिरिष जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आठवडाभरापूर्वीच डॉ . मुंदडा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात दोन मानाच्या पुरस्कारावर डॉ. मुंदडा यांनी मोहर लावल्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget