या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांनी केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला सुनावले की, "नेवासा-संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारून नागरिकांसाठी न्याय मिळवेल
यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली."रस्ते दुरुस्त करा" आणि "प्रशासन हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांच्या हालांची दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल,असा इशारा यावेळी दिला गेला.26 जानेवारी पर्यंत श्रीरामपूर आतील रस्त्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन,रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता,गौतम उपाध्ये, बाळासाहेब खाबिया, योगेश ओझा,संदीप आगरकर,नंदूशेठ कोठारी,संजय कासलीवाल,राहुल कोठारी,प्रेमचंदजी कुंकुलोळ,मुकेश कोठारी,माजी नगरसेवक राजू अदिक, पत्रकार सलीमखान पठाण माजी नगरसेवक भरत कुंकूलोळ,शरद कोठारी, नगरसेवक आण्णासाहेब डावखर, नगरसेवक आशिष धनवटे,भरत जगदाळे,अशोक बागुल,संजय रूपटक्के, अशोक शिवरकर, नवनाथ जेजुरकर, संजय लाड,चंद्रकांत कर्नावट,सुभाष जंगले, नवनाथ शेळके निवृत्त अभियंता नामदे साहेब, कैलास शिंदे,राजेंद्र भोंगळे,राजेंद्र भांबरे, सुरेश कांगुणे,संजय आगाशे,बापूसाहेब तुपे, जगन्नाथ हरार,विजय गांधी,चिरायु नगरकर, नजीरभाई शेख,बुऱ्हान जमादार,मुन्ना पठाण, माजी नगरसेवक सुनील बोलके,सुनील गलांडे,निलेश गोराणे, अमरप्रीत सेठी,माजी नगरसेवक श्याम अडांगळे,निलेश धुस्सा,सुरेश कोळेकर, किरण कर्नावट,दीपक कदम,हरीकृष्ण निर्माळ,नितीन हारदे,धीरज तलवार,संतोष मोरगे,अजय भागवत,मयूर पाटनी,विनीत कुंकूलोळ, निलेश बोरावके,विलास बोरवके,शिवसेनेचे ज्येष्ठ अशोक मामा थोरे, तालुकाप्रमुख लखन भगत,सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्ये,शरद गवारे तेजस बोरावके, युवासेना तालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहर प्रमुख सिद्धांतभैय्या छल्लारे, रोहित नाईक,विशाल पापडीवाल,विक्रम नाईक,अकिल पठाण, प्रमोद गायकवाड,बापू तुपे,रोहित भोसले,अजय छल्लारे,प्रकाश परदेशी, योगेश ढसाळ,शुभम छल्लारे,राजू डुकरे, मुस्ताक शेख,विशाल दुपाती,महेश जगताप, गोरख गुळवे,निलेश मटाले,मोती व्यवहारे, देवेन पीडियार,ज्ञानेश्वर सारंधर,विकी गंगवाल, लोकेश नागर,सुहस परदेशी,बापू बुधेकर, दत्ता करडे,प्रवीण शिंदे,व इत्यादी सह शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment