बेलापूर - येथील तेलोरे चावडी येथे नाताळ सणानिमित्त बालकांनी बाळ येशू ख्रिस्ताचा जिवंत देखावा सादर केला. या देखाव्यात बालकांनी विविध प्रकारचे संदेशाचे फलक झळकावले.बालकांनी सादर केलेल्या जिवंत देखावा बघताच अनेकांनी बाळ येशू , माता मारिया, योसेफ, देवदूत, राजा, मेंढपाळ यांचं प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव घेतला.देखाव्यात प्रत्यक्ष आकाशात देवदूत, जमिनीवर झोपडीत गव्हाणी आणि बाळ येशू सह माता मारिया, पिता योसेफ, समोरुन राजा व त्याचे सहकारी घोड्यावर स्वार झालेले, मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यासह, खरीखुरी शेकोटी, गाढवं, शेती, रस्ते, डोंगरझाडी आणि प्रशस्त रांगोळी यादी सर्व प्रत्यक्षात साकार करण्यात आले.
देखाव्याच्या भोवताली बालकांनी आपल्या हातात अनेक संदेशाचे फलक झळकावले. उदाहरणार्थ "झाडे लावा, झाडं जगवा, पृथ्वी वाचवा", पाणी वाचवा, जीवन वाचवा, मुलगी शिकली, प्रगती झाली, "सर्वधर्म समभाव", यादी संदेशासह बायबल मधील देवाची वचने सादर करण्यात आली. यावेळी अनेक भाविक भक्तांनी, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तोबा गर्दी केली होती. अनेकांनी बालकांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
बाळ येशू ख्रिस्त जन्म जिवंत देखाव्यात उदय तेलोरे, तेजस तेलोरे, संदेश तेलोरे, सागर तेलोरे, श्लोक तेलोरे, आयुष तेलोरे, आशिष तेलोरे, प्रतिक तेलोरे, विशाल तेलोरे, सतेज तेलोरे, अंशुमन शेलार, अनुष बनसोडे, विद्या बनसोडे, अनुष्का तेलोरे, पायल तेलोरे, समिक्षा तेलोरे, आरोही खरात, पुनम तेलोरे यादी बालकांनी सहभाग घेतला
सदर देखावा कार्यक्रम सादर करण्यासाठी रजनीकांत तेलोरे, सुधीरकुमार तेलोरे, भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात, अमोल तेलोरे, आशाबाई तेलोरे, तेरिजा तेलोरे, प्रज्ञा तेलोरे, सोनीताई तेलोरे, ताई खरात, कविता तेलोरे यादींसह अनेकांनी परिश्रम घेतले
सदर बाळ येशू ख्रिस्त जन्माच्या जिवंत देखाव्यास जि.प.सदस्य शरदराव नवले, सरपंच स्वातीताई आमोलिक, उपसरपंच तबसुम बागवान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे, मुश्ताकभाई शेख यादींसह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. श्री.खंडागळे गुरुजी, सिस्टर लुईजा, सिस्टर सिसीली, सिस्टर प्रभा, सिस्टर रिटा, सिस्टर जॅकेलिन, सौ.दुशिंग, श्री. व सौ. पंडित, यादींनी संपूर्ण धर्म प्रांतात प्रत्यक्ष भेटी देऊन स्पर्धेत सहभागी गव्हाणींचं परिक्षण केले. उत्कृष्ट गव्हाणीस बक्षीस देण्यात येणार आहे
Post a Comment