३८ व्या राष्ट्रिय क्रीडा स्पर्धा २०२५!!!तेजस्विनी( मशाल) देवभूमी उजळवण्यासाठी निघाली,मशाल राज्यातील सर्व १३ जिल्ह्यात ३८२३ किलोमीटरचा प्रवास करेल.

गौरव डेंगळे २७/१२ उत्तराखंड:-२८ जानेवारीपासून राज्यात ३८ व्या राष्ट्रीय खेळांना सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि क्रीडा मंत्री रेखा आर्य यांनी मशाल रिलेचे उद्घाटन केले जे राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ३८२३ किलोमीटरचे अंतर कापेल.

गौलापार येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, मशाल खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देईल.खेळाडूंना जिंकण्याचा निर्धार बळकट करावा लागेल जेणेकरून ते अव्वल स्थानी पोहोचू शकतील.क्रीडामंत्री रेखा आर्य यांनी खेळाडूंना सांगितले की, तुम्ही या खेळांमध्ये इतिहास बदला, आम्हाला टॉप-५ मध्ये यायचे आहे.यानंतर मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांनी मशाल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

ही रॅली काठगोदाममार्गे वाहनांतून नैनिताल रोडवरील शहीद पार्कवर गेली. येथून मिनी स्टेडियमपर्यंत ऑलिम्पियन राजेंद्र रावत यांच्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी एकामागून एक मशाल चालवली.

तेजस्विनी राज्याच्या सर्व १३ जिल्ह्यामधील प्रवास करेल,२७ जानेवारी रोजी देरादून मध्ये मशाल रॅली संपन्न होईल. त्यानंतर दिनांक २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय खेळाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येईल.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget