श्रीरामपूर - देशात सध्या चालू असलेल्या कोरोना महामारी आणि आपल्या सर्व शेजारील देशांकडून चालु असलेल्या कुरापती अश्या संकटकाळीन परिस्थितीत आय बी एन 18 न्युज सारखे न्युज चॅनेल चा नालायक अॅंकर अमिश देवगण ने राष्ट्रीय सुफी संत मोईनोद्दीन चिश्ती अजमेरी रहे. यांच्या विषयी एका डीबेट मधे अतिशय चुकीचा शब्द प्रयोग करून देशाच्या मुस्लिम समाज आणि बाबांना मानणाऱ्या असंख्य भक्तांचे मन दुखावण्याचे काम केले आहे. अश्या नालायक पत्रकारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक सा. यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सामाजिक शांतता भंग करणाऱ्या अमिश देवगण सारख्या नालायक देशद्रोही पत्रकारावर कार्यवाही करण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मुस्लिम समाजाच्या वतीने हाजी मुजफ्फरभाई शेख, मुन्नाभाई पठाण, अहमदभाई जहागिरदार फिरोज दस्तगिर,आदिल मखदुमी,डॉ.सलिम शेख, हाजी आरिफ बागवान, भाजपाचे फहीम शेख,साजिद मिर्झा, फिरोज पठाण,शाहीद कुरेशी,एम आय एम चे नाझीम शेख इकबाल शेख,यु.काॅ.चे जाफर शाह, सलिम जहागिरदार, सलिम झुल्ला, जावेद तांबोळी, आय्युब पोपटीया, नदिम तांबोळी, अबुल मणियार,अजून बर्याच समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे.
Post a Comment