श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील वृध्दाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील तपासणी केलेल्या सहाही जणांचे अहवाल काल निगेटिव्ह आल्यामुळे श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.कांदा मार्केट परिसरात राहत असलेल्या एका 75 वर्षीय वृध्दाचा अपघात झाला.त्यास प्रथम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यात तो फ्रॅक्चर झाल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी व पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रथम करोना चाचणी करून त्याचा अहवाल मागविला असता तो पॉझिटिव्ह आला होता.त्यामुळे श्रीरामपूर येथील स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत त्याच्या संपर्कात आलेले त्याच्या कुटुंबातील दोघे व श्रीरामपुरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याच्या संपर्कात आलेले चौघे असे सहा जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल काल सायंकाळी प्रास्त झाला. या सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. हे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला असला तरी श्रीरामपूकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
Post a Comment