अहमदनगर दि.१७ - शहरातील कल्याणरोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी १५ लाख ४४ हजार ८२० रुपयांची विदेशी दारुची वाहतूक करणारा पिकअप गाडी पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नरेंद्र राजेंद्रसिंग रौतेला (वय ४०, रा.घर नं.२०४ प्रेमनगर, माजरा बायपास मलहान, डेहराडून, उत्तरखंड) , चालक बबन भाऊसाहेब काकडे (वय ३५, रा.गोरेगाव ता.पारनेर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार भाळवणीकडून कल्याण रोडाने अहमदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच १६, एई ११८१) ही विदेशी दारुचे बाँक्स घेऊन येत आहे. पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच १६, बीएच १९१९) या गाडीतून दारू घेऊन जाणारा मालक येत आहे. अशी पक्की खबर स्था.गु.शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार स्था.गु शाखेच्या पथकाने नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी सापळा लावून मुद्देमालासह दारू वाहुन नेणाऱ्या दोघांना पंचासमक्ष पकडण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना संदिप कर्डीले, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, सागर सुलाने, कमलेश पाथरुट आदिच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.
Post a Comment