नवी दिल्ली | वृत्तसंस्था पूर्व लडाखमधील गलवान खोर्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव असताना मोठी माहिती समोर आली आहे.या चकमकीत जवळपास 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 पोहोचली असल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे.सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.20 जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला भारतीय लष्करानेही दुजोरा दिला आहे. चकमकीत जखमी झालेले 17 जवानदेखील शहीद झाल्यामुळे एकूण संख्या 20 झाल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. तर या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 पोहोचली असल्याचे समजते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
Post a Comment