अहमदनगर ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील करोना बाधितांच्या आकड्यात मंगळवारी तिने वाढ झाली. यात मुंबई (कुर्ला) येथून आलेल्या दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोघे कुर्ला येथील वाहन चालक असून एका नगरजवळील बोल्हेगाव फाटा येथे तर दुसरा शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव येथे आला होता.तिसरा पॉझिटिव्ह राहाता येथील असून खासगी प्रयोग शाळेत या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 261 वर पोहचली असून यात अवघे 37 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार काल कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव (ता. शेवगाव) येथे आलेला 41 वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही व्यक्ती एसटीमध्ये चालक म्हणून काम करत असून 14 जून रोजी ही व्यक्ती भावी निमगाव येथे गावी आली होती. ताप आणि श्वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल केल्यानंतर घेतलेला त्याचा स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आला आहे.तसेच कुर्ला नेहरूनगर येथून बोल्हेगाव फाटा, (नगर शहराजवळ) येथे आलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती देखील कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती. त्याचा स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच राहाता शहरातील एका व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 261 वर पोहचली आहे.
दिवसभरात 51 अहवाल निगेटिव्ह जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत 3 हजार 508 स्त्राव नमुने तपासले असल्याची जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी यांनी दिली. मंगळवारी सकाळी 31 तर रात्री आणखी 20 असे 51 स्त्राव नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.
सात रुग्णांची करोनावर मात जिल्ह्यातील आणखी सात करोनाग्रस्तांनी आजारावर मात करत घरी परतले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून आज मिळाला डिस्चार्ज मिळाला असून यात संगमनेर 4, राहाता 2 आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 213 झाली आहे.
Post a Comment