श्रीरामपूर (प्रतिनिधी) आतापर्यंत करोनापासून सुरक्षीत राहिलेल्या श्रीरामपूर शहरात करोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे येथे उपचारासाठी गेलेल्या शहरातील एक वृध्दाचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरात राहणार्या या 75 वर्षीय वृध्दाचा 12 जून रोजी अपघात झाला होता. त्याला तातडीने श्रीरामपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसानंतर (दि.14 जून रोजी) त्याला उपचारासाठी पुणे येथे जाण्याचा सल्ला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी दिला.त्यामुळे हा वृध्द 16 जून रोजी पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्या अगोदरत्या त्याची करोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.श्रीरामपुरातील वृध्द करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यात प्रशासनही खडबडून जागे झाले असून त्यांनी तातडीने त्यांच्या घरातील दोघे व श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयातील चौघे असे सहा जणांना स्त्राव तपासणीसाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या वृध्दाचा करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यामुळे करोनापासून सुरक्षीत राहिलेल्या श्रीरामपुर शहरात करोनाने आता शिरकाव केला आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Post a Comment