धामणगांव धाड येथे बुलडाणा एलसीबीची धाड मध्ये 180 क्विंटल धान्य जप्त,रेशनचा धान्य असण्याची शक्यता,तपासाचे सूत्र तहसिल विभागाकडे.
बुलडाणा - 19 जून -स्थानीम गुन्हे शाखा बुलडाणाच्या एका पथकाने धामणगांव धाड येथील एका गोदामावर धाड टाकून अंदाजे 180 क्विंटल धान्य पकडला असुन त्यात तांदूळ,मका,गहु व हरभरा आहे तर तांदूळ व गहु सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात रेशनचा असु शकते,याची शहनिशा बुलडाणा तहिसलचे पुरवठा विभाग करीत आहे.
बुलडाणा तालुक्यातील ताराडखेड येथील नदीम बेग यांनी धामणगाव धाड येथील प्रकाश श्रीराम सपकाळ यांच्या मालकीचे धान्य गोदाम भाडेतत्वावर घेतले आहे. दरम्यान 16 जून रोजी सायंकाळच्या सुमारास बुलडाणा एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजय मोरे,पोलिस उपनिरीक्षक इमरान इनामदार व इतर कर्मचारी वाहनाने गस्तीवर असतांना या गोदामात २ इसम संशयास्पद स्थितीत धान्याची पोती रचतांना दिसून आली. गोदामाची पाहणी केली असता गोदामात अंदाजे तांदूळ 200 कट्टे, मका 150 कट्टे, गहू 12 कट्टे, हरभरा 10 कट्टे असे अंदाजे 180 क्विंटल धान्य दिसून आले. याबाबत चौकशी केली असता सदर धान्य शासकीय वितरण प्रणालीतील विना परवाना साठवून ठेवल्याचा संशय आल्याने एलसीबीच्या पथकाने वरिष्ठांशी संपर्क साधून या बाबत बुलडाणा तहसीलदार यांना पत्र दिल्याने घटनास्थळी बुलडाणा पूरवठा निरीक्षक जूमडे व नायब तहसिलदार अमरसिंह पवार हे पोहचले. सदर धान्यसाठा हा शासकीय वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही हे रात्र झाल्यामुळे समजले नाही.सदर गोदाम 16 जूनला रात्री सील करून पुन्हा आज 17 जून रोजी उघडण्यात आले व सदर धान्याची मोजमाप करून सदर धान्यसाठा बुलडाणा येथील शासकीय धान्य गोदामात जमा करण्यात आल्याची माहिती आहे. पकडलेला धान्यातील तांदूळ व गहु हे रेशन चा आहे किंवा नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसले तरी,या प्रकरणी काय कार्यवाही होते? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Post a Comment