खंडीत पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला अचानक आग
बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपुर तालुक्यातील कडीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सहा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या जलजीवन कामावरील पाईपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे ठेकेदाराचे नुकसान झाले.अग्नीशामक बंड वेळेवर दाखल झाल्याने मोठी हानी टळली. सहा गावाला पाणी पुरवठा करणार्या खंडीत पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला अचानक आग लागली .सदरील आगेची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवरा कारखान्याच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास वेळ लागला शेजारी च शंभर दीडशे फूट अंतरावर असलेले नारळाचे झाडे देखील पेटले. उष्ण वातावरण असल्याने धुराचा लोळ एवढा मोठ्या प्रमाणात होता की दोन अग्निशमन दल येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. सदर कामावरील सुपरवायझर यांच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असल्याचे नागरिक बोलत होते. सहा गावातील व कोलारसह नागरिक आगार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र वातावरणातील उष्णता व आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला सदर ठेकेदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. तालुक्यात व जिल्ह्यात जलजीवांचा कामाचा खेळ खंडोबा आणि ठिकाणी पहावयास मिळाला यामध्ये ही घटना घडल्याने अनेक ठिकाणी आपापसात नागरिक बोलताना सांगत होते की जलजीवन म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा अतिशय दिन मे गतीने या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते त्यातच ही आग लागल्याने अजून एक दीड वर्ष पुढे लुटल्याने नागरिक बोलत होते. याआधी देखील ट्रांसफार्मर शिफ्टिंग करताना सदरील पाईप ने पेट घेतला होता तरीही सुपरवायझरने दक्षता घेतली नसल्याचे नागरिक बोलत होते
Post a Comment