बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन स्त्रावक संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने बेलापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
बेलापूर (प्रतिनिधी )-बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन स्त्रावक संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने बेलापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराचा जवळपास 90 शिबीरार्थींनी लाभ घेतला बेलापूर येथील जैन स्थानकात बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन श्रावक संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा जवळपास 90 लाभार्थ्यांनी लाभ घेतला यात डोळे तपासणी मोतीबिंदू तपासणी तसेच डोळ्यांच्या सर्व आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना नंबरच्या चष्म्याची आवश्यकता होती अशा व्यक्तींना अल्पदरात चष्म्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर येथील प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, नेत्र चिकित्सक परमेश्वर मोटे, तसेच आनंद ऋषीजी नेत्रलयाचे जनसंपर्क अधिकारी सागर देवकर उपस्थित होते या शिबिरास जि प सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई यांनी शिबीरास भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष व जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष शांतीलाल हिरण, जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष विजय कटारिया, अमित लुंक्कड, संदीप देसर्डा, योगेश कोठारी, सचिन कोठारी, विकी मुथा, दिलीप बाठीया, स्वप्निल बोरा आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment