चिरंजीव साईश ढोकणे यांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश
बेलापूर ( प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपन्न केले असून त्यांनी केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. चिरंजीव साईश ढोकणे एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे.त्याने आय एम विनर या परीक्षेत दोनशे पैकी 180 गुण मिळवून राज्यात पाचवा जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. त्याचबरोबर बीटीएस परीक्षेत राज्यामध्ये सहावा जिल्ह्यातील तिसरा तर तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविला तसेच एन एस सी परीक्षेत राज्यात सातवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच मंथन या परीक्षेत राज्यांमध्ये नववा जिल्ह्यात चौथा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ऑलिंपियाड या परीक्षेत राज्यात नववा जिल्ह्यात सहावा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला तसेच लक्षवेध परीक्षेत राज्यांमध्ये तेरावा जिल्ह्यात आठवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच महात्मा फुले जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धेमध्ये चिरंजीव साईश यांने कमी वयात हा बहुमान मिळवला आहे. त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पैठणी मॅडम व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले साईश ढोकणे हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत
Post a Comment