अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न,अंनिसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बुधवंत यांची निवड

"डॉ.प्रकाश गरुड,प्रमोद भारुळे उपाध्यक्ष, विष्णू गायकवाड कार्याध्यक्ष तर विनायक सापा,देवदत्त साळवे प्रधान सचिव"

अहिल्यानगर( प्रतिनिधी):---  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त 

 सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत,उपाध्यक्ष पदी प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.प्रकाश गरुड तर कार्याध्यक्ष पदी विष्णू गायकवाड यांची निवड झाली आहे.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हा प्रेरणा मेळावा  रविवार दि.४ मे रोजी सकाळी १० वाजता नगर येथील शार्दुल नर्सरी,नालेगाव येथे  संपन्न झाला. 

समितीचे राज्य कार्यवाह कॉ.बाबा आरगडे, राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस अड.रंजना गवांदे या राज्य निरीक्षकांच्या उपस्थितीत पुढील दोन वर्षांकरिता अहिल्यानगर  जिल्हा कार्यकारिणी

निवडण्यात आली.


*नवीन जिल्हा कार्यकारिणी अशी....*


श्री.बाबासाहेब  बुधवंत (जिल्हा अध्यक्ष),डॉ.प्रकाश गरुड व  श्री. प्रमोद भारुळे (जिल्हा उपाध्यक्ष),श्री.विष्णू गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष), श्री.विनायक सापा व श्री.देवदत्त साळवे (जिल्हा प्रधान सचिव), अड.अभय राजे (कायदेशीर सल्लागार), श्री.सुखदेव फुलारी (सोशल मीडिया विभाग जिल्हा कार्यवाह),  श्री.शशिकांत गायकवाड (बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.कारभारी गायकवाड (जात पंचायत मुठमाती अभियान विभाग जिल्हा कार्यवाह),

श्री.दीपक शिरसाठ (संविधान जागर विभाग जिल्हा कार्यवाह), श्री.बी.के.चव्हाण (विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह),प्राचार्य अशोक गवांदे (निधी संकलन विभाग जिल्हा कार्यवाह),श्रीमती छाया बंगाळ

(महिला सहभाग विभाग जिल्हा कार्यवाह)


यावेळी अशोक सब्बन,कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत आरगडे, अनिता सापा, प्रा. किसन शेवाळे, अरविंद गाडेकर, काशिनाथ गुंजाळ, हरिभाऊ उगले, विनायक ताकपेरे, शशिकांत जाधव, भावना भारुळे, शब्बीरभाई पठाण, रामचंद्र जाधव, संजय शिरोळे, एड. अभय राजे, शुभम पात्रकंठी, दीपक शिरसाठ, अड. राहुल बुधवंत यांचे सह  जिल्ह्यातील अकारा शाखाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


निरीक्षक कॉ.बाबा आरगडे, डॉ.ठकसेन गोराणे, अड.रंजना गवांदे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब बुधवंत,उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गरुड,कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, अशोक सब्बन  यांनी मार्गदर्शन करून संघटना वाढीकरिता सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, शाखांच्या नियमित साप्ताहिक शाखा बैठका घ्याव्यात, समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते शाखेत जाणिवपूर्वक जोडून घ्यावेत, महिला व युवांना जोडून घेऊन पुढील दोन महिन्यांत प्रत्येक शाखेचे शाखा कार्यकर्ता व शिक्षक प्रशिक्षण शिबीर आयोजित करावेत, शाळा- महाविद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करावे,सर्वांनी अंनिप या मासिकाचे वर्गणीदार व्हावे, आँनलाईन सभासद नोंदणी केलेल्या सभासदांना त्या त्या ठिकाणी जोडून घ्यावे असे आवाहन केले.

शशिकांत गायकवाड यांनी आभार मानले.

हम होंगे कामयाब  या गीताने प्रेरणा मेळाव्याचा समारोप झाला

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget