बेलापुर (प्रतिनिधी )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले
नसेल ना अशी शंका नातेवाईकांना येत आहे पोलीस केवळ अश्वासने देत आहे या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले लाँक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे गणेश भिंगारदे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.
Post a Comment