बेलापुर (प्रतिनिधी )-सामाजीक , शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या जाणकारांनी एकत्र येवुन व्यापारी ,कष्टकरी ,सर्वसामान्य नागरीकासाठी सुरु केलेल्या गांवकरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल असा विश्वास महंत उध्दवगीरीजी महाराज मंडलीक यानी व्यक्त केला. जि .प .सदस्य शरद नवले व साहेबराव वाबळे यांच्या नेतृत्वाखाली गांवकरी ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेचे उद्धाटन सद्गुरु नारायणगीरीजी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाण नेवासा येथील मठाधिपती महंत उध्दवगीरीजी महाराज मंडलीक यांच्या हस्ते संपन्न झाले त्या वेळी बोलताना महंत उध्दव महाराज मंडलीक म्हणाले की आपला जिल्हा हा सहकार चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गांवकरी पतंसंस्थेमुळे बेलापुरच्या वैभवात आणखी भर पडली आहे मोठ्या बँंकाकडे कर्ज मागणी करताना अनेक कागदपत्रांची तरतुद करावी लागते त्यामुळे व्यापारी ,कष्टकरी लोकांचा कल पतसंस्थेकडे वाढत आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची उत्तम सेवा घडो असेही मंडलीक महाराज म्हणाले या वेळी संस्थेचे सभासद १३०० असुन उद्धाटनापूर्वीच संस्थेकडे ५० लाख रुपयांच्यापुढे ठेवी गोळा जमा झाल्या असल्याची माहीती पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे व व्हा चेअरमन रामेश्वर सोमाणी यांनी दिली या वेळी माजी सभापती इंद्रनाथ पाटील थोरात जि प सदस्य शरद नवले पंडीत महेशजी व्यास रणजीत श्रीगोड भास्कर खंडागळे गिरीधर पा आसने नितीन भागडे युवराज भोसले सुनिल साठे हरिष थोरात किशोर कलांगडे अमोल शेटे विलास शेटे प. स. सदस्य अरुण पा. नाईक युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे सरपंच महेंद्र साळवी सुभाष अमोलीक रावसाहेब अमोलीक प्रफुल्ल डावरे विशाल आंबेकर संजय गोरे जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण पत्रकार देविदास देसाई मारुती राशिनकर ज्ञानेश गवले नवनाथ कुताळ दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम अजिज शेख हाजी ईस्माईल शेख प्रकाश पा नाईक मोहसीन सय्यद अनील पवार आदिसह सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर विशाल आंबेकर यांनी आभार मानले.

Post a Comment