बेलापूर (वार्ताहर)ःस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बेलापूर बु।। ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असुन प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात १५ आँगस्ट पासुन करण्यात येणार असल्याची माहीती जि प सदस्य शरद नवले व सरपंच महेंद्र साळवी यांनी दिली आहे . या अभियानातंर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे घरोघर जावुन सर्वेक्षण करण्यात येणार असून कौटुंबिक आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार आहे.त्यात त्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहीती असणार आहे घरातील सदस्यांना कोणते आजार आहेत कोवीड लसीचे किती डोस केव्हा घेतले या बाबतची सर्व माहीती संकलीत केली जाणार आहे या अभियानाचा मान्यवरांच्या हस्ते स्वातंंञ्यदिनाचे औचित्य साधुन शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,आरोग्याधिकारी डॉ.देविदास चोखर,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,प्रकाश पा. नाईक, जालिंदर कु-हे, ज्येष्ठ पञकार मारुती राशिनकर,भास्कर बंगाळ,इस्माईल शेख,भाऊसाहेब कुताळ,प्रकाश नवले,पञकार देविदास देसाई,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गवले, सुहास शेलार,दिलीप दायमा,किशोर कदम प्रकाश कु-हे,प्रभात कु-हे,सुरेश अमोलिक,शफीक बागवान,किशोर खरोटे,गणेश बंगाळ,जिना शेख, बाबा शेख,अकबर सय्यद अजिज शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment