बेलापूर (प्रतिनिधी )-बेलापूर गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 15 ते 17 नागरिकांना चावा घेतला असून जखमी नागरिकांना अहिल्यानगर, श्रीरामपूर शिर्डी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान काळया रंगाच्या कुत्र्याने अनेक नागरीकांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले गावातील मैनुदा शेख वय 70 वर्ष या घरात झोपलेले असताना झोपलेल्या अवस्थेतच कुत्र्याने त्यांच्या ओठाचा व कपाळाचा लचका तोडला तसेच एका महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा झालेली आहे साई मगर वय वर्ष 14 ,साक्ष शरद गोरे वय 25वर्ष मतीन काझी वय 15वर्ष ,सागर जोशी वय 32वर्ष शारदा रेनिवाल वय 54 वर्षे सविता विशाल साबळे यांना तातडीने बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी लिपटे,डॉ. शैलेश पवार आरोग्य सेवक कडू रोहन ,गणेश टाकसाळ,ग्रेटा कदम, आरोग्य सेविका पुजा वाघमारे वंदना खरात संतोष शेलार यांनी तातडीने उपचार केले. त्यानंतर त्या सर्वांना बाजार समितीचे माजी उपसभापती खंडागळे अभिषेक सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख मोहसीन सय्यद राहुल माळवदे असीफ शेख रोहीत शि़दे यांनी
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून अहिल्यानगर येथे पाठविले त्याचबरोबर काही रुग्ण श्रीरामपूर येथील दवाखान्यात दाखल झाले तर काही रुग्ण शिर्डी येथे उपचार घेत आहेत या घटनेची माहिती मिळताच बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, दत्तात्रय वक्ते, योगेश अमोलिक, अविनाश शेलार, सागर भिंगारदिवे व नागरिकांनी त्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुत्रा कुठेही आढळला नाही या पिसळलेल्या कुत्र्याला बाहेरून कुणीतरी गावात सोडले असावे अशी चर्चा आहे. बेलापूरच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली असून अनेकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा त्याचबरोबर गावात अनेक मोकाट कुत्री फिरत आहेत त्याचा देखील ग्रामपंचायत बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे



Post a Comment