बेलापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने बे बेलापूर आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामा मस्जिद येथे विविध दाखल्यांचे घरांचे आयोजन करण्यात आले होते त्यात आधार कार्ड रेशन कार्ड विविध प्रकारचे दाखले नागरिकांना देण्यात आले. भाजप उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर व भाजप अल्पसंख्याक मोर्चा अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष रऊफभाई शेख यांच्या आवाहनानुसार, श्रीरामपूर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजीज शेख यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी जामा मस्जिद बेलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूलमध्ये विविध शासकीय कागदपत्रांसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
या कॅम्पचे उद्घाटन संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरदराव नवले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे पाटील, बेलापूर भाजपा शहराध्यक्ष प्रफुल्लजी डावरे, जिल्हा सचिव निलेशजी हरदास, श्रीरामपूर तालुका माजी उपाध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, जाफरभाई अत्तार, शफीकभाई बागवान, आसिफ शेख, जब्बार अत्तार, सूरज बडे, मुख्तार सय्यद, सुलतान शेख, मुनीर बागवान, मोहसीन हाजी बाहोद्दीन सय्यद, अनिस काजी, जमीर शेख, इम्तियाज अत्तार, जावेद बागवान एजाज सय्यद आदी उपस्थित होते.
कॅम्पमध्ये नागरिकांना पासपोर्ट, गॅझेट, आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच आधार-पॅनकार्ड दुरुस्ती, KYC, बस पास आणि महा-ईडी कार्ड आदी सेवांचा लाभ देण्यात आला. यामध्ये १९ पासपोर्ट, १७ गॅझेट, २० आधारकार्ड, ३५ पॅनकार्ड, ३२ आधार-पॅनकार्ड दुरुस्ती, १३ KYC, १० बस पास आणि ५ महा-ईडी कार्ड अशा विविध सेवांसाठी नागरिकांनी नोंदणी केली.
बेलापूर तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासकीय कागदपत्रांच्या सुविधेबाबत विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी शहरात जाण्याची होणारी गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
कॅम्पच्या आयोजनासाठी प्रसाद लढ्ढा, इंगळे व साळवे यांचे विशेष सहकार्य लाभले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अजीज शेख, मोहसीन हाजी बाहोद्दीन सय्यद, शफीक बागवान, आसिफ शेख, जब्बार अत्तार, मुख्तार सय्यद, सुलतान शेख, हारून सय्यद, जुबेर अत्तार, कैफ काझी, मोईस शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी मोहसीन हाजी सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment