शिर्डी (राजेंद्र गडकरी)- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे ,चार मे पासून सुरू झालेल्या या लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा व काही दुकाने उघडण्यास जरी परवानगी मिळाली आहे ,तरी स्थानिक प्रशासनाने दुकानांच्या वेळा ठरवून त्या वेळतच दुकाने उघडी ठेवावीत मात्र कोठेही गर्दी करू नये ,अशी माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे, लॉकडाऊन चा तिसरा टप्पा सुरू झाला असून ग्रीन, ऑरेंज व रेड झोन करण्यात आले आहेत, अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका कोरोना मुक्त आहे ,मात्र यापुढेही कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी दक्षता घेण्यात येत आहे, शाळा महाविद्यालय मॉल्स बंदच राहणार आहेत, राहाता तालुक्यात ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा सहित काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी शासनाच्या आदेशान्वये स्थानिक प्रशासन, कामगार तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, यांनी आपल्या गावातील, शहरातील इतर दुकानांच्या वेळा ठरवून या वेळेतच दुकाने उघडी ठेवावीत दुकानात किंवा इतर ठिकाणी गर्दी करू नये , या काळात 144 कलम लागू राहणार आहे ,त्यामुळे कुणी रस्त्यावर ,गल्लीत ,सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये ,कोणताही कार्यक्रम, समारंभ करू नये, लॉकडाउनचे पाळावेत, लॉक डाऊनचे नियम मोडले तर अशांवर कडक कारवाई करण्यात येईल ,असा इशाराही तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे, सर्व नागरिकांनी लॉक डाउन च्या आतापर्यंतच्या 40 दिवसात प्रशासनाला चांगले सहकार्य केले, असे सहकार्य 17 मे 20 20 पर्यंत असणाऱ्या लॉक डाऊन या काळात प्रशासनाला करावे, विनाकारण फिरू नये घरातच राहावे आपल्या आरोग्य आपल्या कुटुंबाचे आरोग्य आपल्या गावाचे आपल्या तालुक्याचे आरोग्य सांभाळावे राहता तालुका कोरणा मुक्त आहे व यापुढेही राहील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे ,प्रशासनाला सहकार्य करावे लॉक डाऊन चे नियम पाळावेत ,असे आवाहनही तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
Post a Comment