(शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी ) कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राहता तालुक्यातही लॉकडाऊन सुरू आहे ह्या काळात उज्वला गॅस लाभार्थींना एप्रिल, मे ,जून या कालावधीत गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत उज्वला गॅस सिलेंडर देण्याचे घोषित केले असून श्री साई गॅस एजन्सी शिर्डी यांच्या मार्फत एप्रिल मध्ये एकूण २०४७ महिला ग्राहक लाभार्थ्यांनी या मोफत उज्वला गॅस चा लाभ घेतला आहे
लॉकडाउनच्या काळात गावागावात , घरोघरी जाऊन उज्वला गॅस सिलेंडर एजन्सीचे कर्मचारी देत आहेत , अडचणीच्या काळात स्वयंपाकासाठी महिलांना इंधनाची मोठी गरज असल्याने व ते या संकटकाळात
घरपोच मिळत असल्याने महिला लाभार्थीकडून समाधान व्यक्त होत आहे गॅस एजन्सी कर्मचारीसुद्धा डॉक्टर नर्स पोलीस स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रमाणेच असून तेही आपला जीव धोक्यात घालून घरपोच उज्वला गॅस सिलेंडर पोहोच करत आहेत त्यांचे शिर्डी परिसरातून अभिनंदन होत आहे,
राहता तालुक्यात एकूण पाच गॅस एजन्सी धारक आहेत, राहता बाभळेश्वर, दाढ, पुणतांबा या गॅस एजन्सी बरोबरच शिर्डी व परिसरासाठी श्री साई गणेश गॅस एजन्सी असून, या एजन्सीकडे एकूण 3257 उज्वला गॅस चे लाभार्थी ग्राहक आहेत ,त्यापैकी एप्रिल महिन्यात 2047महिला लाभार्थींनी उज्वला गॅस सिलेंडर घेऊन या योजनेचा लाभ घेतला, या सर्व लाभार्थींचे पैसे त्यांच्या खात्यावर बँकेत जमा झाले आहे, त्यामुळे राहीलेल्या लाभार्थी महिलांनी बँकेत जाऊन पैसे काढून गॅस सिलेंडर घ्यावेत किंवा ऑनलाईन पैसे भरावेत, ज्यांनी एप्रिलमध्ये उज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला अशा महिला लाभार्थींना मे महिन्यात उज्वला गॅस सिलेंडरची रक्कम त्यांच्या नावे बँकेत जमा होणार आहे, लाभार्थींना एप्रिल, मे ,जून असे तीन महिन्यासाठी उज्वला गॅस मोफत मिळणार आहे, उज्वला गॅस महिला लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सी कोणतेही वाहतूक खर्च, हाताळणी खर्च आकारात नाही, ,बँकेत आलेल्या आपल्या उज्वला गॅस सिलेंडरचे पैसे काढून किंवा ऑनलाईन भरून उज्वला गॅस सिलेंडर या काळात खरेदी करून इंधनाची या काळातील अडचण दूर करत आहे, त्यासाठी श्री साई गॅस एजन्सी चे संचालक बबनराव भुसारी, मॅनेजर गव्हाणे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत याकाळात प्रत्येक जण घरात आहे, सर्व कुटुंबांना गॅस सिलेंडर महत्त्वाचे आहे अशा संकट काळात सुद्धा गॅस एजन्सी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लॉकडाऊन चे नियम पाळत घरोघरी उज्वला सिलेंडर पोहोच करीत आहेत, जसे डॉक्टर्स, नर्स ,पोलीस, स्वच्छता कर्मचारी, शासकीय अधिकारी, अहोरात्र परिश्रम घेत आहेत त्याचप्रमाणे गॅस एजन्सी काम करीत आहे, मे-जून मध्येही ही उज्वला गॅस महिला लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री साई गॅस एजन्सी मार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment